अतिक्रमण बाबत हिंदुत्ववादी संघटनेचे ग्रामपंचायत व पोलीस ठाण्यास निवेदन

पुलाची शिरोली / कुबेर हंकारे

पुलाची शिरोली ग्रामपंचायत व तंटामुक्त समितीने १५ फेब्रुवारी रोजी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकामास अडसर ठरत असलेले अतिक्रमण काढण्यात आले. यामध्ये व्यवसायिकांनी चहाची टपरी,पान टपरी, नाश्ता सेंटर अशा विविध व्यवसाय येथे थाटले होते.यामुळे ग्राहकांची वाहने रस्त्यावरती पार्किंग केल्यामुळे वाहतुकीची कोंडीने वादावादी होऊन हाणामारी ही घडली आहेत याची दखल घेत ग्रामपंचायतने प्राथमिक आरोग्य केंद्रच्या संरक्षण भिंती लगत असणारे अतिक्रमण काढले आहे.या पार्श्वभूमीवर पुलाची शिरोली येथील हिंदुत्ववादी संघटना कडून सार्वजनिक ठिकाणी शाळा प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात विवादित अतिक्रमण कायमचे बंद करणे बाबत येथील हिंदुत्ववादी संघटनाकडून ग्रामपंचायत व शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये निवेदन देण्यात आले.या निवेदनात म्हटले की शिरोली गावात मोठी औद्योगिक वसाहत,शाळा,स्कुल,जिल्हा परिषद दवाखाना आहे या परिसरात अनेक जणांनी अतिक्रमण करून बेकायदेशीर धंदे व तरुण मुलांना व्यसनाधीन करण्यासाठी गुटखा, मावा, तंबाखू ,अमली पदार्थ  ठेऊन तरुण पिढी बरबाद करणेचे काम चालु आहे.व याच टपरीवर उभे राहून अनेक रोडरोमिओ शाळकरी मुलींची छेडछाड करणेचे प्रकार घडल्याचे समोर येत आहेत.सार्वजनिक ठिकाणे,शाळा,प्राथमिक आरोग्य केंद्र भागातील टपरी,खोकी या परिसरामध्ये पुन्हा अतिक्रमण होऊ देऊ नये अन्यथा पुढे काही अनुचित प्रकार घडला तर याला सर्वस्वी जबाबदार शिरोली ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाला धरले जाईल असे हिंदुत्वादी संघटनेकडून मागणी करण्यात आली आहे. यावेळी यावेळी सतिश पाटील,प्रशांत कागले,संदिप पोर्लेकर,अजय मेनिगिरी, शुभम पाटील,विक्रम पार्टे ,रूषीकेश सरनोबत, धनाजी लोहार, धैर्यशील माळी, कार्तीक पाटील, अभिषेक लाड, विजय सुर्यवंशी,संदिप पाटील, प्रविण सातपुते,अक्षय मेनकरी, समर्थ खबाले आदी उपस्थित होते

Spread the love
error: Content is protected !!