कुरुंदवाड शहर कडकडीत बंद,आरक्षणाची कायदेशीर पूर्तता करावी

कुरुंदवाड / प्रतिनिधी

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू असून त्यांची प्रकृती खालावली आहे.सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी तात्काळ अधिवेशन घेऊन मागासवर्गीय आयोगाकडे अहवाल सादर करावा आणि आरक्षण देण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू कराव्यात यामागणीसाठी कुरुंदवाड शहर कडकडीत बंद पाळण्यात आले होते.व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार बंद ठेवून मराठा समाजाच्या मागणीला पाठिंबा दिला.महिला आघाडी ही आक्रमक झाली असून राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत आश्वासनाची मालिका सुरू केली आहे.समाजाची घोर थट्टा करून जरांगे पाटील यांच्या जीविताशी खेळ सुरू केला आहे.आमच्या योध्याला रक्त सांडायला लावले आहे.सरकारने विलंब न लावता आरक्षणाची कायदेशीर पूर्तता करावी अन्यथा या सरकारला बांगड्यांची आहेर दिल्याशिवाय आम्ही महिला गप्प बसणार नाही असा इशारा सुजाता डकरे,कांचन लाड यांनी दिला.
कुरुंदवाड शहर सकल मराठा समाजाच्यावतीने मनोज रंगे पाटील यांची परिस्थिती खालावल्याने कुरुंदवाड शहर बंदची हाक देण्यात आली होती त्यानुसार व्यापाऱ्यांनी आपले सर्व व्यवहार बंद ठेवले होते कुरुंदवाड शहरात दिवसभर शुकशुकाट पसरला होता.मराठा समाज बांधवांनी राज्य सरकारच्या विरोधात कुरुंदवाड शहरातून निषेध रॅली काढून पालिका चौकात आल्यानंतर या रॅलीचे निषेध सभेत रुपांतर झाले.या निषेध सभेत माजी नगराध्यक्ष दयानंद मालवेकर म्हणाले राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याची घोषणा केली.मात्र त्याची मागासवर्ग आयोगाकडे पूर्तता करण्यासाठी कोणतीच हालचाली केलेल्या नाहीत.शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव उगळे म्हणाले मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अण्णासाहेब पाटील यांनी आपले बलिदान दिले आहे.जरांगे पाटील यांचे आम्ही बलिदान देऊ देणार नाही.आरक्षण मिळवल्याशिवाय गप्प बसणार नाही असे सांगितले.यावेळी महिपती बाबर, गोपाळ चव्हाण,बबलू पवार,मिलिंद गोरे,रामचंद्र मोहिते, आदींनी भाषणे केली.यावेळी नायकू ढेरे,रमेश भूजुगडे, कृष्णा नरके,आण्णासाहेब शिंदे,सुरेश बिंदगे,राजू आवळे, आनंदा पवार,तुकाराम पवार,आनंदा बेले,अनिल चव्हाण, रुपाली शिंदे,शितल उगळे,सरिता बिडकर,आरती डकरे, सुरेखा पवारआदी महिला व सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love
error: Content is protected !!