यातूनच त्याची हत्या झाली असावी असा पोलिसांचा अंदाज

सांगली येथील संतोष कदम हत्या प्रकरणाती सांगली जिल्ह्यातील समडोळी येथील वीट भट्टीवर काम करणाऱ्या दोन संशयीतांना रात्री उशिरा कुरुंदवाड पोलिसांनी ताब्यात घेतले.एकजण फरार.
नोकरी लावतो असे सांगून दोघांकडून साडेदहा लाख रुपये संतोषने घेतल्याचे समजते.यातूनच त्याची हत्या झाली असावी असा पोलिसांचा अंदाज.
कुरुंदवाड / प्रतिनिधी
सांगली येथील संतोष कदम हत्या प्रकरणी समडोळी तालुका मिरज येथील दोन वीटभट्टी चालकांना कुरुंदवाड पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री सुमारास ताब्यात घेतले आहे.नोकरी लावतो असे सांगून संशयितिकडून लाखो रुपये संतोष कदमने घेतल्याचे समजते.दरम्यान पोलीस उपअधीक्षक समीरसिंह साळवे,सपोनी रविराज फडणीस यांनी 24 तासातच या खुनाचा छडा लावत दोन संशयीतांना ताब्यात घेतले आहे.सांगली येथील बेपत्ता माहिती अधिकार कार्यकर्ता संतोष विष्णु कदम (वय 36 रा.गावभाग सांगली)याचा धारदार चाकूने वार करुन खून झाल्याची खळबळजनक घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली.कदम याचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह मारुती स्वीफ्ट या चारचाकी वाहनात आढळून आला.खून करुन हल्लेखोर वाहन रस्त्यावर सोडून पसार झाले. दरम्यान सांगली महापालिकेवर गुरुवारी गाढव मोर्चा काढण्यासाठी सांगली शहर पोलीस स्टेशनला संतोष कदम आणि निवेदन देण्यासाठी गेला असता त्यावेळी त्याला आलास ता.शिरोळ येथील माती औटीवरून फोन आला होता.तिथेच थांब असे सांगून संतोष कदम हा त्याठिकाणी गेल्याचे समजते.कुरुंदवाड पोलिसांनी त्या माती औटीवरील जेसीबी चालकाला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता समडोळी येथील वीट भट्टीवर काम करणाऱ्या दोन कामगारांची दोघांना ताब्यात घेतले आहे तर एकजण फरार आहे.पोलिसांनी तपास यंत्रणा गतिमान केली असून त्याच्या शोधासाठी पथके रवाना केली आहे.
Spread the love
error: Content is protected !!