शिरोळात रविवारी तालुकास्तरीय इयत्ता पाचवीची शिष्यवृत्ती सराव परीक्षा

शिरोळ / प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज जयंती व दिनबंधू दलितमित्र माजी आमदार स्वर्गीय दिनकररावजी यादव यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मराठा क्रांती मोर्चा सेवक महाराष्ट्र आणि रोटरी क्लब ऑफ शिरोळ हेरिटेज सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने येथील पद्माराजे विद्यालयात रविवार दिनांक ११ फेब्रुवारी २०२४ रोजी इयत्ता पाचवीच्या वर्गाकरिता शिष्यवृत्तीच्या परीक्षेची पूर्वतयारी करिता शिरोळ तालुकास्तरीय शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.
शिरोळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती सराव परीक्षा घेण्यात येणार आहे.परीक्षेतील प्रथम द्वितीय तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.तसेच सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.तालुक्यातील सुमारे ८५० विद्यार्थी या परीक्षेत सहभागी होणार आहेत. शिरोळ पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या नियंत्रणाखाली रोटरी क्लब ऑफ शिरोळ हेरिटेज सिटी पद्माराजे विद्यालय यादव परिवार शिरोळ मातोश्री चाईल्ड क्लिनिक यांच्या सहकार्याने ही शिष्यवृत्ती सराव परीक्षा होणार आहे.मराठा क्रांती मोर्चा सेवक महाराष्ट्राचे संस्थापक अँड.राजेश टेकाळे शिरोळ पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी सौ.भारती कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत व युवा नेते पृथ्वीराजसिंह यादव यांच्या अध्यक्षतेखाली परीक्षेचा बक्षीस वितरण समारंभ होणार आहे.अशी माहिती रोटरी क्लब ऑफ शिरोळ हेरिटेज सिटीचे प्रेसिडेंट संजय तुकाराम शिंदे,सेक्रेटरी तुकाराम पाटील,ट्रेझरर संजय रामचंद्र शिंदे,इव्हेंटचेअरमन डॉ. अतुल पाटील यांनी दिली.यावेळी रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे सर्व सदस्य उपस्थित होते.

Spread the love
error: Content is protected !!