जयसिंगपूर पोलीस ठाणे हद्दीत चेनस्नँकींग मोटारसायकल चोरी घटनेच्या अनुषंगाने गुन्हे शोध पथकातील पोलीस काँन्टेबल रोहित डावाळे,अमोल अवघडे, वैभव सुर्यवंशी पट्रोलिंग करत असताना पोलीस काँन्टेबल रोहित डावाळे यांना गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की आंबेडकर सोसायटी येथे एक इसम डिस्कवर गाडीवरून संशयित रित्या फिरत आहे.त्यावेळी सदर ठिकाणी गेले असता एक इसम रस्त्याचे कडेला डिस्कवर गाडी नंबर KA 23 EA 5998 घेऊन उभा असलेला दिसून आला त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता तो उडवा-उडवीची देऊ लागला त्याला विश्वासात घेत अधिक चौकशी केली असता त्याने आपले नाव विशाल कल्लापा कांबळे व वय ४९ राहणार यादवनगर जयसिंगपूर तालुका शिरोळ असे सांगितले तसेच त्याने अंदाजे सहा ते सात महिन्यापूर्वी एसटी स्टँड जयसिंगपूर येथील बाकड्यावर ठेवलेल्या बँगेतील सोन्याचे दागिने असलेली पर्स चोरून नेले असल्याची कबुली दिली.सदर आरोपीला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून कौशल्यपुर्ण तपास केला असता आरोपीने सांगली जिल्ह्यामध्ये दोन तर मुरगूड मध्ये एक असे चार गुन्हे केले असलेची कबुली दिली.सदर आरोपी कडून एकुण 47 ग्रॅम वजनाचे दोन लाख रुपये किंमतीचे दागिने जप्त करण्यात आले.सदरची कारवाई पोलीस ठाणे कडील गुन्हे शोध पथकाचे पोलीस काँन्टेबल रोहित डावाळे,अमोल अवघडे,वैभव सुर्यवंशी यांनी केली असलेची असलेची माहिती पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी गुरुवारी सायंकाळी 4 वाजता दिली.तसेच यापूर्वी आरोपी विशाल कांबळे याचे विरोधात वृध्द महिलांना पेन्शन काढून देण्याच्या बनाव करत दागिने काढून घेण्याचे सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात बारा गुन्हे दाखल असलेचे सांगितले आहे.