ब्रेकिंग तलाठी अमोल जाधव याच्यावर लाच लुचपत विभागाची कारवाई
7/12 वर नाव लावण्यासाठी 5000 रु ची लाच मागितली होती.
यातील 4000 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले.
तलाठी कार्यालयात झाली घटना
कोल्हापूर लाचलुचपत विभागाची कारवाई
तक्रारदार यांचे नातेवाईक यांना इचलकरंजी येथील रिसनं ४५२ क्षेत्र ०.०.९० आर इतकी मिळकत रजिस्टर बक्षीसपत्राने २०१९ मध्ये दिलेली आहे.सदर मिळकतीचे सात बारा पञकी नांव नोंद करणेसाठी तक्रारदार यांच्या बाजूने देणेसाठी तडजोडीअंती स्वतःसाठी 5 हजार रुपये लाचेची मागणी करून 4 हजार रुपयाची लाच स्वीकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले असून आरोपी यांचेविरुद्ध इचलकरंजी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर कारवाई सुरू आहे.
ही कारवाई पर्यवेक्षण अधिकारी सरदार नाळे,पोलीस उपअधीक्षक,श्रीमती आसमां मुल्ला, पोलीस निरीक्षक सपोफौ प्रकाश भंडारे, पोहेकॉ अजय चव्हाण,पोहेकॉ सुधीर पाटील,पोना सचिन पाटील,पोकॉ संदीप पवार,पोहेकॉ विष्णु गुरव,पोहेकॉ सुरज अपराध ला.प्र.वि.कोल्हापूर यांनी केली.