कोल्हापूर / प्रतिनिधी
आर्गनायझेशन फॉर राईटस ऑफ ह्युमन(आफ्रोह) कोल्हापूर जिल्हा शाखेचे खुले त्रैवार्षिक अधिवेशन व सर्वसाधारण सभा संपन्न झाली.महाराष्ट्र राज्यातील खुल्या प्रवर्ग, बहुजन,आदिवासीतील वंचितांच्या प्रश्नासाठी झटणारी मानवाधिकार संघटना म्हणजेच आफ्रोह संघटना आहे.
आफ्रोह संघटनेच्या कोल्हापूर जिल्हा शाखेच्या खुले त्रैवार्षिक अधिवेशनाचे उद्घाटन कॉंग्रेस पक्षाचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या शुभहस्ते झाले. अध्यक्षस्थानी दि प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष आण्णासाहेब शिरगावे होते.
आमदार सतेज पाटील म्हणाले,मी निश्चितपणे तुमच्या पाठीशी राहिन.भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपन्न होत असताना देशाची घटना टिकली पाहिजे.आज शासकीय सेवेतील अनेक रिक्त पदे भरावयाची आहेत तरीही शासनाचे नवनवीन जी.आर.येत आहेत.
संघटित ताकद मोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.त्याला संघटितपणे विरोध करुन सर्वधर्मसमभाव टिकविणे काळाची गरज आहे.संघटीत ताकद अबाधित ठेवली तरच लोकशाही टिकेल.शासनावर दबाव टाकण्यासाठी संघटना महत्त्वाची आहे.आपल्या त्रैवार्षिक अधिवेशनाला मी मनापासून शुभेच्छा देतो.
सर्वसाधारण सभेतील व अधिवेशनातील सर्व ठरावाला पाठींबा देतो.लोकप्रतिनीधीच्या माध्यमातून प्रश्न सोडविणारी लोकशाही अबाधित राहिली पाहिजे. संघटनाना नैतिक पाठिंबा देणे माझ्यासारख्या लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे.
अध्यक्ष स्थानावरून सभाध्यक्ष आण्णासाहेब शिरगावे म्हणाले,कोल्हापूर जिल्ह्यात विविध शासकीय कार्यालयामध्ये पेन्शन मिळते परंतु जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्याकडून पेन्शन आदा करत नसल्याची भावना व्यक्त केली.यावरती आमदार महोदयांनी सोमवारी अथवा मंगळवारी जिल्हा परिषद माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे भेट घेण्याचे आश्वासन दिले.
डॉ.मनोहर कोळी,महादेव व्हंकळी,बसवंत पाटील, प्रा.शरण खानापूरे,भारती धुमाळ,अभय जगताप संजय कुमार कोळी, दिलीप मोहाडीकर,नारायण चांदेकर,रमेश वरुडकर,नरेंद्र पराते,रवींद्र हेडाऊ,गजेंद्र पौनीकर यांनी सभेला उद्देशून मार्गदर्शन केले.प्रास्ताविक आफ्रोह संघटनेचे राज्यकार्याध्यक्ष राजेश सोनपराते यांनी केले.
याप्रसंगी कळंबा गावच्या सरपंच सुमनताई गुरव,बबनराव रानगे,भगवान कोळी,रमेश शंकर कोळी,दिलीप शिरढोणे, नारायण कोळी,मारूती कोळी,सुभाष तराळ यांचेसह आफ्रोह संघटनेचे पदाधिकारी,सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.शेवटी आभार प्रदर्शन नंतर कार्यक्रमाची सांगता झाली.