इचलकरंजी / प्रतिनिधी
येथील काकासाहेब माने मेमोरियल ट्रस्ट संचलित मालती माने विद्यालयात बलसागर भारत होवो विषयावरील सादरीकरण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यामध्ये 10 विविध भाषेतील गाणी, 7 सामाजिक समस्या, देश म्हणजे व्यक्ती, कुटुंब आणि आपल्या गावाचा विकास , संविधानाची पंचाहत्तरी,साने गुरुजी 125, त्या त्या राज्यांची वैशिष्ट्ये या गोष्टी रंजक पद्धतीने गाण्याच्या माध्यमातून सादर झाल्या.
कार्यक्रमाचे उद्घाटन वर्ल्ड बुक रेकाॅर्डमध्ये विक्रम केलेले तालवाद्याचे फेमस वादक ऋतुराज कोरे आणि गायिका भक्ती माळी यांनी उद्घाटन व सादरीकरण केले.
मुख्याध्यापक संजय रेंदाळकर यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख करुन दिली.संस्थेचे अध्यक्ष अमरसिंह माने यांच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त चरखा देवून आनंद व्यक्त करण्यात आला.
रेखा पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर मनिषा कांबळे यांनी आभार मानले. यातील गाण्यांची निवड आणि संहिता संजय रेंदाळकर यांनी बनवली होती. कार्यक्रमात घोरपडे नाट्यगृह विद्यार्थी आणि पालकांनी खचाखच भरले होते. कोरिओग्राफर म्हणून सुनिल पोवार, सुप्रिया माने, जयश्री मांडवकर यांनी काम केले.