भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात ७ शेळ्या ठार

कुरुंदवाड  / प्रतिनिधी

कुरुंदवाड दरम्यानच्या मजरेवाडी रस्त्यावरील जिमी घोरपडे यांच्या शेतात शेळी-मेंढी खतासाठी बसवण्यात आलेल्या शेळ्या-मेंढ्यांच्या कळपावर 10 ते 15 भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात 7 शेळ्या ठार झाल्या तर 3 पिल्ली पळवून नेली आहेत.तर 10 शेळ्या जखमी झाल्या असून त्या गंभीर अवस्थेत आहेत.

 

या हल्ल्यात सावंता सुभाष वावरे (वय.35,रा.कुरुंदवाड) याचे अंदाजे 80 हजाराचे नुकसान झाले आहे.कुत्र्यांची आणि शेळ्यांची आरडा-ओरड ऐकून परिसरातील शेतकरी,शेत मजुरांनी घटनास्थळी धाव घेऊन कुत्री हाकलून लावली.दरम्यान मजरेवाडी ता.शिरोळ येथील गणपतराव घाटगे यांच्या शेतात 15 दिवसांपूर्वी संजय पुजारी(रा.मजरेवाडी ता.शिरोळ)या मेंढपाळाच्या शेळ्या मेंढ्या बसवण्यात आल्या होत्या.

 

त्यावेळी रात्रीच्या सुमारास भटक्या कुत्र्यांनी हल्ला चढवून 10 शेळ्या फस्त करत 90 हजाराचे नुकसान झाले होते.हा दुसरा हल्ला झाल्याने मेंढपाळ व्यावसायिकातून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मजरेवाडी रस्त्यावरील गोपाळ बाग लगत असणाऱ्या घोरपडे यांच्या शेतात मेंढ-खतासाठी सावंता वावरे यांच्या बसविण्यात आलेल्या शेळ्यांच्या कळपावर भटक्या

 

 

कुत्र्यांनी हल्ला चढवला या हल्ल्यात तीन पिल्लांचा कुत्र्यांनी फडशा पडला तर सात शेळ्यांचा ठिकठिकाणी चावा घेऊन घोट घेतला. यामध्ये त्या शेळ्या ठार झाल्या. जखमी अवस्थेत दहा शेळ्या आहेत. पंधरा दिवसांपूर्वी मजरेवाडी बाळूमामा रस्त्याजवळील भोसले यांच्या शेतात बसविण्यात आलेल्या शेळ्या मेंढ्यांच्या कळपावर ही भटक्या कुत्र्यांनी हल्ला चढवत 15 शेळ्या ठार केल्या होत्या.

 

भटक्या कुत्र्यांच्या दिवसेंदिवस होत असलेल्या या हल्ल्यामुळे मेंढपाळ धनगर समाजातून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शासनाने या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.दरम्यान पशुवैद्यकीय अधिकारी प्रमोद झेंडे,गाव कामगार तलाठी मनोहर कुलकर्णी, कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार विवेक कराडे यांनी मृत शेळ्यांचा पंचनामा केला.यावेळी सामाजिक कार्यकर्ते उमेश कर्णाळे,बाबासो गावडे आदी उपस्थित होते.

Spread the love
error: Content is protected !!