पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
बत्तीस शिराळा इथून कागलकडे येणाऱ्या बायोगॅस वाहतूक करणाऱ्या ट्रकमधून पुलाची शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्र इथ व्हॉलव मधून गॅस गळती होऊन आवाज येवू लागल्यानं सगळ्यांची एकच तारांबळ उडाली.मात्र चालकाने प्रसंगावधान राखत व्हॉल बंद केल्यानं अनर्थ टळला.मात्र यामुळं वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाल्यानं पोलीस यंत्रणा आणि अग्निशमन दल प्राथमिक आरोग्य केंद्र मधील डॉक्टर कर्मचारी या सर्वांचीच तारांबळ उडाली.
शुक्रवारी सकाळी बत्तीस शिराळा इथून इंडस्ट्रीजसाठी लागणारा बायोगॅस घेवून आयशर ट्रक क्रमांक एम एच १० जी आर २९०६ कागलकडे येत होता.दरम्यान हा ट्रक सकाळी १० वाण्याच्या सुमारास प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ आल्यानंतर बायोगॅस टॅंक मधील काही टोच्यांचा व्हॉल निकामी झाल्याने मोठा आवाज येवून गॅस गळती होऊन गॅस हवेत मिसळू लागला होता.
हवेत मिसळून त्याचा स्पोट होईल या भीतीने परिसरातील नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली.गॅस दुर्गंधीमुळे डॉक्टरांचे कामकाज काही काळासाठी थांबविण्यात आले.कारण गॅसची दुर्गंधी मोठ्या प्रमाणात परिसरात पसरली होती.काही रुग्ण उपचारापूर्वीच घरी निघून गेले.गॅस गळती होत असल्याचं निदर्शनास आल्यानंतर ट्रक चालक दत्तात्रय फराकटे यांनी प्रसंगावधान राखत ट्रक रस्त्यकडेला उभा केला.बायोगॅस टॅंक मधून गॅस गळती होऊन धूर येत असल्यानं लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.मात्र ट्रक चालक व स्थानिक नागरिकांच्या मदतीने झालेले व्हॉल बंद केल्याने गॅस गळती थांबली.
या घटनेची माहिती शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांना समजतात त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यासह घटनास्थळी धाव घेतली व घटनेची पाहणी केली.मात्र या घटनेमुळे याठिकाणी काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.दरम्यान शिरोली एम आयडीसी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.
गॅस गळती रोखून ट्रक मार्गस्थ करत पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.मात्र या घटनेमुळे पोलीस आणि अग्निशमन दलाची प्राथमिक आरोग्य केंद्र मधील डॉक्टर कर्मचारी यांची चांगलीच तारांबळ उडाली होती.