दिग्विजय संपतराव माने
संस्थापक ‘युवा पर्व’ वाढदिवस
शिरोळ : शशिकांत उर्फ सचिन पवार
कमी वयात “दिग्विजय” यांनी आपल्या सामाजिक कार्याने उद्याच्या युवा नेतृत्वाची चुणूक पावलोपावली दाखवून दिली आहेत.कारण दिग्विजय म्हणजे अचूक निर्णय क्षमता आणि त्यांच्या एका हाकेस शेकडो युवकांची फळी त्यांच्या पाठीशी जमा होणारे असे धाडशी युवा नेतृत्व त्यामुळे जीवाला जीव देणारे कार्यकर्त्यांचे मोठं जाळ निर्माण केलं.
राजकीय, सामाजिक,शैक्षणिक कार्यात असणारी तळमळ पाहिली तर दिग्विजय हे भविष्यातील शिरोळ नगरीतील नव्या राजकीय समीकरणातील आश्वासक तरुण चेहरा ठरतील.असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.कारण अतिशय लहान वयात यांनी नैसर्गिक आपत्ती असो वा सामाजिक अडीअडचणी नागरिकांच्या संकटात धावून येणारी तरुणांची फळी निर्माण केली
आणि या संघटनेला त्यांनी “युवा पर्व..नवे सर्व…या टॅगलाईनखाली युवकांचे संघटन कौशल्य कसे असावं हे दाखवून दिले.आणि याच “युवा पर्वच्या” माध्यमातून दिग्विजय यांनी शिरोळ तालुक्यातील “महापुर..”आणि यामध्ये होणारे पूरग्रस्तांचे हाल,स्थलांतर,अन्न,
वस्त्र,निवारा यासाठी प्रयत्न करून जोडलेल्या माणसांच्या कडून शक्य तितकी मदत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. तसेच अख्या जगाने जन्ममरणाचा खेळ अनुभवला तो म्हणजे ‘कोरोना’ काळात सुद्धा दिग्विजय आपल्या परीने अनेक वयोवृद्ध अनेक गोरगरीब लोकांची सेवा लोकसहभागातून केली.
त्यांचा या सामाजिक कार्याची दखल घेऊन शिरोळ शहर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष पदी निवड केली.सामाजिक कार्याच्यामाध्यमातून युवकांच्या साथीने कायम न थकता काम करत राहिले.दिग्विजय यांनी कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना शिरोळ नगरीमध्ये कला क्रीडा सांस्कृतिक व व्यायाम या क्षेत्राबरोबरच मनोरंजन,
कबड्डी स्पर्धा,हातगाडा ही नवीन शर्यत आपल्या प्रयत्नातून पार पाडली. याचबरोबर मुक्या जनावरांच्या जीवनवरणाचा महाभयंकर “लंम्पी” रोगाने थैमान घातले त्यावेळी दिग्विजय आणि शासकीय स्तरावर शिरोळ नगरीमध्ये पशुवैद्यकीय अधिकारी,डॉक्टर यांच्या गाठीभेटी घेऊन
वेळप्रसंगी “रोग प्रतिबंधक लस” आपले पैसे घालून ही लस उपलब्ध केली.आणि गावातील बऱ्याच अशा मोठ्या प्राण्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला.तसेच कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीचे अवचित्य साधून शिरोळ नगरीतील रयत शिक्षण संस्थेचे
श्री पद्माराजे विद्यालय व जुनिअर कॉलेज मधील गरीब,गरजू आणि होतकरू अशा आर्थिक दुर्बल असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वार्षिक शैक्षणिक फी भरण्याची जबाबदारी दिग्विजय माने यांनी “युवा पर्व”च्या माध्यमातून घेतली.
शिरोळ मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये भव्य आणि दिव्य अशी दहीहंडी,गणेशोत्सव मंडळांना समाज प्रबोधन पर तसेच इतिहास आणि सांस्कृतिक परंपरा जिवंत राहावी.यासाठी या मंडळांना प्रोत्साहन
देण्यासाठी गणेशोत्सव काळामध्ये सजीव देखाव्यांना दिग्विजय यांनी आपल्या “युवा पर्व “च्या माध्यमातून त्यांचे कौतुक करून त्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. समाजामधील सर्वांची दखल घेणारा सतत कार्यरत असणारा दिग्विजय स्वतः एक चांगला क्रिकेटपटू आहे.
त्याचे स्वप्न भारतीय संघात एक दिवस नामवंत क्रिकेटपटू म्हणून खेळायचे आहे.यासाठी तो कोल्हापूर येथे प्रशिक्षण घेत आहे.
सद्यस्थितीला राजकारणाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन राजकारण म्हणजे “गटारगंगा “आहे असे म्हटले जाते परंतु शेतकऱ्यांचे कैवारी
माजी खासदार राजू शेट्टी म्हणतात की “ही गटारगंगा स्वच्छ करण्यासाठी राजकारण आणि समाजकारणात तरुणांनी उस्फूर्तपणे सहभागी व्हायला हवे”आणि या त्यांच्या म्हणण्याप्रमाणेच शिरोळ नगरीतील एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेले दिग्विजय माने यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना राष्ट्रवादी
काँग्रेस पक्षाचे संस्थापक आणि राष्ट्रीय नेते शरदचंद्रजी पवार आणि त्यांच्या पक्षावर त्यांच्या विचारावर अफाट निष्ठा व प्रेम करत अतिशय लहान वयापासूनच समाजकारण आणि राजकारणात आलेलं नेतृत्व निर्माण केलं.शिरोळ नगरीचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष अमरसिंह माने पाटील (भैय्या) यांचा एक सच्चा कार्यकर्ता व
माजी नगरसेवक तरुण तडफदार युवा नेतृत्व शरद उर्फ बापूजी मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली एक आज्ञाधारक कार्यकर्ता म्हणून प्रामाणिकपणे कार्यरत आहेत.महाराष्ट्रात गेल्या दोन महिन्यापासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणसाठी सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांना गाव बंदी केली.
त्यावेळी प्रसिद्धीसाठी नाही तर समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या उदात्त हेतू ठेवून आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन मराठा बांधवांचा पाठीशी राहत सर्वप्रथम समाजकारण मग राजकारण
अशा या धाडसी नेतृत्वाचा आज वाढदिवस “दिग्विजय माने” यांना आजच्या या वाढदिवसाच्या दिनी त्यांच्या पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा…!!