महिलांना दुधापासून पनीर बनविण्याचे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत असणाऱ्या शरद कृषि महाविद्यालय, जैनापुर येथील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी ग्रामीण कृषि जागरुकता व कृषि कार्यानुभव आणि कृषि औद्योगिक कार्यक्रम अंतर्गत खिद्रापूर येथील महिलांना दुधापासून पनीर बनविण्याचे प्रात्यक्षिक देऊन मार्गदर्शन केले.अत्यंत पौष्टिक आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीचा पदार्थ म्हणजे पनीर,प्रोटीन्स, कॅल्शियम आणि कॅलरीजचे प्रमाण पनीरमध्ये अधिक असलेने याचे आहारात समावेश असणे आवश्यक आहे . हीच गरज ओळखून घरच्या घरी दुधापासून पनीर बनविण्याचे प्रात्यक्षिक येथील महिलांना दाखविण्यात आले.यावेळी कृषिदूत प्रतिक बडधे, रोहित हराळे, धवलराज जगदाळे, पंकज केवारे, पवन कोळी, श्रेयस कुलकर्णी उपस्थित होते.या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.एस.जे पाटील, उपप्राचार्य आणि कार्यक्रमाचे प्रमुख प्रा.एस.एच.फलके, कार्यक्रम समन्वयक प्रा.डॉ.आर.टी कोळी व कार्यक्रम अधिकारी प्रा. ए.एस. माळी, विषय शिक्षक प्रा.एस.वी.चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.

Spread the love
error: Content is protected !!