कोल्हापूरला ऐतिहासिक वारसा आहे.रंकाळा हे कोल्हापुरातील महत्त्वाचे ठिकाण असून कोल्हापूरकरांच्या भावना त्याच्याशी जोडल्या गेल्या आहेत.श्री क्षेत्र अंबाबाई व श्री ज्योतिबा मंदिर विकास आराखडा प्रमाणेच रंकाळ्याचा विकास आराखडा तयार करा यासाठी आवश्यक असणारा निधी देण्यात येईल असे सांगून रंकाळ्याच्या तटबंदीची दुरुस्ती करुन घ्या.झाडांना पार बांधून घ्या.सार्वजनिक ठिकाणच्या वास्तूंची डागडुजी त्या त्या वेळीच करुन घ्या.विकास कामे करण्यासाठी चांगले कॉन्ट्रॅक्टर नेमा,ही कामे करताना शहराचे विद्रुपीकरण होणार नाही,याचे कटाक्षाने पालन करा.रंकाळयासह शहर परिसरात दैनंदिन साफसफाई होत असल्याची पाहणी करुन शहर परिसर स्वच्छ व सुंदर ठेवा.सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या विजेच्या खांबावरील विद्युत व्यवस्था आवश्यक त्याच वेळेत सुरु ठेवून विजेची बचत करा, असे त्यांनी आवर्जून सांगितले. इमारतींचे स्थलांतर करताना नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या.कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक विषय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्यातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री हसन मुश्रीफ व सर्वांनी मार्गी लावले आहेत.सध्या प्रलंबित असणारे विषय नक्कीच सोडवले जातील. शासन स्तरावर धोरणात्मक निर्णयासाठीच्या विषयांबाबत लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घ्यावी, त्यांनी मंजुरी दिलेल्या कामांना निधीची तरतूद करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. तर मंजूर झालेली कामे जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी पालकमंत्र्यांच्या सहकार्यातून समन्वयाने करुन घ्यावीत. तसेच जिल्ह्यातील प्रलंबित विषय तात्काळ मार्गी लावण्यासाठी त्या त्या विभागांनी शासन स्तरावर पाठपुरावा करा, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.