प्रभू श्री रामचंद्राचा प्राणप्रतिष्ठा सोहळा याची देही याची डोळा !

रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे ।
रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः..

म्हणजेच राम, रामभद्र, रामचंद्र, विधात्री स्वरूप, रघुनाथ, भगवान सीतापती या सर्वांना माझा नमस्कार…
आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादाच्या सोबतीने प्रभू श्री रामचंद्राचा प्राणप्रतिष्ठा सोहळा याची देही याची डोळा पाहण्याचं सदभाग्य लाभलं….माहित नाही कोणत्या जन्मीचं पुण्य फळाला आलं आणि हा नयनरम्य सोहळा अनुभवता आला.
आयुष्यातील हे दहा दिवस नव्यानं उर्जा देणारे ठरले. अयोध्येचा आणि श्रीरामलल्लाचं वर्णन काय करावे. तिथल्या हवेमध्येसुद्धा प्रभू श्री रामचंद्र आपल्याला जाणवतात.
तिथल्या मातीमध्ये,कणाकणामध्ये श्रीराम आपल्याला दिसतात.अजूनही श्री रामचंद्र डोळ्यासमोरून जात नाहीत…असं वाटतंय की ,आयुष्यात काहीतरी चांगलं काम केलं असावं, त्याचं फळ मिळाले.
आज देह, काया,वाचा, मन सगळं काही पावन झालं असं वाटतंय.
शब्दात वर्णन करण्यासारखे अनुभव नाहीतच…तिथे मिळालेलं समाधान मांडण्यासाठी शब्दच सापडत नाहीत.असे म्हणतात की, माणसांनं फक्त आपलं कर्म करत रहावे.
ज्या गोष्टींमधून आपल्याला समाधान मिळते, त्या गोष्टी करत राहाव्यात, आपण आपलं काम करत राहावं, प्रामाणिकपणे केलेल्या कामाचे फळ नेहमीच आपल्याला मिळतं…आणि मला वाटते की आता मला आयुष्याकडून कसल्याच अपेक्षा राहिल्या नाहीत…
शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं…

श्रीरामचन्द्रचरणौ मनसा स्मरामि
श्रीरामचन्द्रचरणौ वचंसा गृणामि ।
श्रीरामचन्द्रचरणौ शिरसा नमामि
श्रीरामचन्द्रचरणौ शरणं प्रपद्ये ॥
…मी मनाने श्री रामचंद्रांच्या चरणांचे स्मरण करते,माझ्या वाणीने श्री रामचंद्रांच्या चरणांचा जप करते,श्री रामचंद्रांच्या चरणी नतमस्तक होऊन श्री रामचंद्रांच्या चरणांचा आश्रय घेते…

– प्रा.डाॅ.प्रतिभा पैलवान

Spread the love
error: Content is protected !!