राजर्षी शाहू विद्या मंदिर शिरोळ १ मध्ये मुलांनी भरवला आठवडा बाजार

 

शिरोळ /  प्रतिनिधी

येथील राजर्षि शाहू विद्यामंदिर शिरोळ नं.१ या शाळेत शालेय मुलांचा आठवडी बाजार उपक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.आशा शहापुरे यांनी केल.आठवडी बाजाराचा शुभारंभ प्रगतशील शेतकरी भगवंत पाटील संजय शंकर माळी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. दोन्ही प्रगतशील शेतकऱ्यांचा परिचय माजी मुख्याध्यापक भगवान कोळी यांनी करून दिला.

 

कार्यक्रमाचे अध्यक्षा पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी सौ भारती कोळी या होत्या. उपस्थित मान्यवरांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला विद्यार्थ्यांनी भरवलेल्या आठवडी बाजारास पालकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ भारती कोळी यांनी पालकांना व विद्यार्थ्यांना आठवडे बाजाराचे महत्त्व सांगितले. दैनंदिन जीवनात बाजारातील व्यवहार, पालेभाज्यांचे महत्त्व व उपयुक्तता समजावून सांगितले.

 

मुलांना पालकांनी विविध कामे सांगावी. प्रोत्साहन द्यावे. जीवनात कष्टाला महत्त्व आहे. कोणताही व्यवसाय कमी दर्जाचा नसतो. प्रामाणिकपणा सचोटी या गुणामुळे व्यवसाय वाढतात. सर्व मुलांचे पालकांचे शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांचे कौतुक केले.

 

शाळेच्या विविध उपक्रमात सर्वांचा सहभाग उल्लेखनी असल्याचे नमूद केले.तसेच इयत्ता ३ रीचा विद्यार्थी प्रणव कुंभार याने आपल्या वाढदिवसानिमित्त नेताजी सुभाषचंद्र बोस यांची प्रतिमा भेट दिली.

 

यावेळी त्यांचे पालक राहुल कुंभार मुख्याध्यापक नूरमहम्मद मुल्ला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विवेक फल्ले उपाध्यक्षा सुप्रिया गावडे सदस्य अमर मोरे राजेश संकपाळ सारिका माने आनंदा कुंभार प्रदीप पिसाळ संजीवनी चुडमुंगे, श्रद्धा कुन्नुरे ,अश्विनी पाटील ,मोहिनी कांबळे शाळेचे शिक्षक विमल वर्धन, भारती इंगळे, प्रियंका जगदाळे, तेजस्विनी पाटील, अश्विनी चुडमुंगे , रमजान पाथरवट यांच्यासह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाळासाहेब कोळी यांनी सूत्रसंचालन केले तर आभार दीपक वावरे यांनी मानले.

Spread the love
error: Content is protected !!