१७ दिवसात २५०० किलोमीटर प्रवास करत शांती सदभावना सायकल यात्रा

१७ दिवसात २५०० किलोमीटर प्रवास करत शांती सदभावना सायकल यात्रा

बाहुबली / विनोद शिंगे

आचार्य १०८ श्री चंद्रप्रभूसागर जी महाराज यांच्या प्रेरणेने ही पाचवी शांती सद्भावना सायकल यात्रा आयोजित करण्यात आली होती. ही यात्रा वाघा बॉर्डर येथून दि ६ जानेवारी २०२४ रोजी निघाली होती आणि मंगळवार दिनांक २३ जानेवारी २०२४ रोजी बाहुबली कुंभोज येथे समाप्त करण्यात आली.पर्यावरणाचे रक्षण, देश प्रेम, बंधूभावना, झाडे लावा झाडे जगवा, पाणी आडवा जीवन वाचवा अशा मौलिक संदेशा करिता ही सायकल यात्रा आयोजित करण्यात आली होती.सुमारे २५०० किलोमीटर इतका प्रवास केवळ १७ दिवसात पूर्ण करण्यात आला. कधी कधी एका दिवसाला २०० किलोमीटर ही प्रवास घडला. या यात्रेत वय वर्ष ३० पासून ७० पर्यंतचे एकूण वीस लोक सहभागी होते.
बाहुबली येथील सांगता समारंभ प्रसंगी या सर्वांचे सहभाद्य स्वागत करण्यात आले बहुबली संस्थेच्या वतीने आणि श्री पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट कुंभोज यांच्या वतीने या सर्व सायकल फोटो महानुभावांचे सन्मान करण्यात आले यावेळी बाहुबली गुरुकुलाचे नातं श्री दीपक काणे यांनी या यात्रेचा अनुभव मुलांना समजावून सांगितले.यावेळी संचालक गोमटेश बेडगे उपमुख्याध्यापक अनिल हिंगलजे,एस एस पाटील पर्यवेक्षक नेमिनाथ बाळीकाई, तांत्रिक विभाग प्रमुख रवींद्र देसाई, अध्यापक अध्यापिका विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love
error: Content is protected !!