शिरोळ / प्रतिनिधी
यशवंत ब्रिगेड महिला आघाडीच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षा सौ योगिता राजेंद्र घुले यांच्या पुढाकारातून येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावरील ऊसतोड महिला मजुरांच्यासोबत हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला यास उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगामाकरिता ऊस तोडीसाठी आलेल्या महिला मजुरांच्या खोपीवर जाऊन यशवंत ब्रिगेड महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी हळदीकुंकू समारंभ साजरा केला.या समारंभामुळे ऊसतोड महिला मजुरांमध्ये उत्साहपूर्ण व आपलेपणाची भावना निर्माण झाली मकर संक्रांतीचे वाण म्हणून भेटवस्तूही देण्यात आल्या.
यावेळी यशवंत ब्रिगेड महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ योगिता घुले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या हळदीकुंकू समारंभास मेघा गावडे, स्वाती वाघमोडे, संगीता पुजारी,सारिका पुजारी,मनीषा पाटील,रेखा शिंदे, ललिता माने,वंदना पाखरे यांच्यासह ऊसतोड महिला मजूर मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.