खासदार सुप्रिया सुळे यांनी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या,शिक्षण विकास मंच आयोजित चौदावी राज्यस्तरीय शिक्षण परिषदेस उपस्थिती दर्शवली.
यावेळी सौ सुळे यांनी’नवीन शैक्षणिक धोरण,भारतीय संविधान आणि शालेय शिक्षण’ या विषयावरील आयोजित शिक्षण परिषदेत उपस्थित राहून शिक्षकांशी संवाद साधला.
या परिषदेत ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत सुनीलकुमार लवटे यांनी आपले विचार व्यक्त केले.या एकदिवसीय परिषदेमध्ये शालेय विद्यार्थ्यांनी आपले संविधान या विषयावरील ‘टॉक शो’चे उत्तम सादरीकरण केले.
तसेच ‘नवीन शैक्षणिक धोरण, भारतीय संविधान आणि शालेय शिक्षण’या विषयावर डॉ. कमलादेवी आवटे यांनी विचार व्यक्त केले.’संविधानातील मूल्य विचार व शालेय शिक्षण’या विषयावरील चर्चेत राही श्रुती गणेश, ऐनुल अत्तार, बसंती रॉय यांनी सहभाग घेत मार्गदर्शन केले.
‘आपले आयकार्ड’ या विषयाच्या अनुषंगाने श्रीरंजन आवटे यांनी भारतीय संविधानाचे महत्त्व अधोरेखित केले. परिषदेचे महेंद्र गणपुले यांनी सूत्रसंचालन केले.
याप्रसंगी संस्थेच्या फरीदा लांबे,दत्ता बाळसराफ,यशवंतराव चव्हाण सेंटरच्या सीईओ दीप्ती नाखले,शिक्षण विभागाचे प्रमुख योगेश कुदळे,शिक्षण विकास मंचची टीम,राज्यभरातील शिक्षक व शिक्षण क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित होते.