केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ घरा घरापर्यंत पोहचविण्यात मोदीं सरकारचे कार्य महत्वपूर्ण

बेडकिहाळ / प्रतिनिधी

गेल्या 9 ते 10 वर्ष पासून केंद्रातील भाजपा सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या मुळेच देशाचा अमुलग्रह विकास होत असून, खेड्यातील व शहरीभागातील सर्व जनतेचा विकास मोदि सरकारमुळे होत आहे.या माध्यमातून आनेक विकास.योजनेचा लाभ जनतेस मिळत आहे.अनेक योजना प्रत्येक भारतीयांच्या घरा घरात पर्यंत पोहचविण्याचे कार्य यशस्वी पणे झाले आहे. तर सद्या भारताचे नांव साऱ्या जगात उंचावले आहे.असे मत खासदार आण्णासाहेब जोल्ले यांनी व्यक्त केले. ग्रामपंचायत बेडकिहाळ व बँक ऑफ बरोडा शाखा बेडकिहाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संकल्प विकशीत यात्रा जण पर माहित कार्यक्रमा प्रसंगी बोलत होते.माजी मंत्री व आमदार शशिकला जोल्ले, हालसिद्धनाथचे उपाध्यक्ष पवन पाटील,संचालक जयकुमार खोत,रामगौडा पाटील,श्रीकांत बन्ने,ग्राम पंचायत अध्यक्ष शिवानंद बिजले,सदस्य तात्यासाहेब केस्ते,मलगौडा पाटील,तसेच आण्णा पाटील,संजय पाटील (चांद शिरदवाड) यांच्या प्रमुख उपस्थित झालेल्या या कार्यक्रमा प्रसंगी स्वागत व प्रास्ताविक आर जी डोमणे यांनी केले. तर कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार,आमदार व उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते रोपाला पाणी घालून करण्यात आले.याप्रसंगी विश्वकर्मा योजनेतील विश्वकर्मा समुदायाच्या ८ कारागिरांना व्यवसाय किटचे वितरण वितरण करण्यात आले.तर आयुष्मान भारत योजनेतील लाभार्त्यांनाही कार्डचे वितरण करण्यात आले.यावेळी आमदार जोल्ले म्हणाल्या गेल्या ७५ वर्षात देशाचा विकास किती झाला होता याचे अवलोकन करा.व आत्ता बीजेपी सरकारच्या काळामध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय रस्ते विकास, अवकाशयान,देशाची सुरक्षा व्यवस्था, महिलांसाठी अनेक आर्थिक विकास योजना, क्रीडा क्षेत्रातील आघाडी,वैद्यकीय सुविधा.अस्या बऱ्याच योजना व आर्थिक लाभ ज्या त्या गावातील राष्ट्रीयकृत बँके मार्फत लाभार्त्यांना मिळत आहेत.तर ५०० वर्षा पासून देशवाशियांचे श्री राम मंदिराचे स्वप्न मोदींच्या मुळे साकार होत आहे. रोखर आम्ही तुम्ही भाग्यवान आहोत.या प्रसंगी बँक ऑफ बरोडाचे सहाय्यक अधिकारी किरण मिरजे यांनी बँके मार्फत केंद्र शासनाकडून उपलब्द होत असलेल्या विविध योजनेची माहित करून दिले. तर लता काकडे, शिवलीला निप्पाने, मंगल हणबरट्टी, प्रशांत सुतार, तात्यासाहेब केस्ते, यांनी केंद्र सरकारकडून मिळालेल्या योजनेच्या लाभ बद्दल कृतज्ञता व्यक्त केले.

Spread the love
error: Content is protected !!