नगरसेवक अभय मगदूम यांच्या वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

नगरसेवक अभय मगदूम यांच्या वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

बोरगांव / प्रतिनिधी

बोरगाव येथील नगरसेवक व जय गणेश मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे संस्थापक चेअरमन अभय मगदूम यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सर्वरोग निदान शिबिराचे उद्घाटन युवा नेते उत्तम पाटील व उद्योगपती अभिनंदन पाटील यांच्या शुभहस्ते फितकापून

 

करण्यात आले.या विविध व्याधिंच्या सर्वरोग निदान शिबिरामध्ये जवळपास 400 हून अधिक रुग्णांनी सहभाग दाखवल्याने वाढदिवस संयोजन कमिटीने आयोजित केलेल्या या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असल्याचे दिसत आहे.यावेळी युवा नेते उत्तम

 

पाटील म्हणाले नगरसेवक अभय मगदूम हे एक कर्तबगार आणि समाज हितासाठी सदैव झटणारे नेतृत्व आहे.त्यामुळे त्यांनी केलेल्या कार्याच्या जीवावरच आज या ठिकाणी मोठ्या उत्साहात हे आरोग्य व रक्तदान शिबिर राबवले जात आहे.दरम्यान बोलताना अभय

 

मगदूम म्हणाले की,आपण ज्या मातीत जन्मलो त्या मातीचे ऋण फेडण्यासाठी सदैव तत्पर आहोत आणि त्या पार्श्वभूमीवरच आपण हे सर्वरोग निदान शिबिराच्या आयोजन केले आहे.त्याचबरोबर संस्थेच्या माध्यमातून असे विविध उपक्रम आम्ही नेहमी राबवत असल्याचेही

 

सांगितले.विशेष म्हणजे या शिबिरात सहभागी झालेल्या सर्व रुग्णांना मोफत औषधांचेही वितरण वाढदिवस संयोजन कमिटी मार्फत करण्यात आलेला आहे.यावेळी उद्योगपती अभिनंदन पाटील यांनीही अभय मगदूम यांच्या कार्याची प्रशंसा करत त्यांना शुभेच्छा दिल्या.

 

प्रारंभी बोरगाव शहराचे दिवंगत ज्येष्ठ नेते बाबुराव मगदूम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलाने या शिबिरास प्रारंभ होऊन उपस्थितांच्या शुभ हस्ते अभय मगदूम यांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी पृथ्वीराज पाटील,अशोक पाटील, पोपट पाटील, राजु मगदुम,प्रदीप माळी ,अभय कुमार करोले, दिगंबर कांबळे,

 

रोहित पाटील, तुळशीदास वसवाडे,अरुण बोने,जयपाल हवले,सुजाता पाटील, शोभा हवले,अश्विनी मगदूम, राजशेखर हिरेमठ यांच्यासह विविध क्षेत्रातील डॉक्टर ,जय गणेश मल्टिपर्पज को ऑफ सोसायटी, व गौरी गणेश महीला संघ चे सर्व संचालक मंडळ,अंगणवाडी, आशा कार्यकर्ते ,पंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love
error: Content is protected !!