आशा वर्कर्स,गट प्रवर्तक कर्मचारी संघटनेतर्फे आमदार यड्रावकर यांना निवेदन

आशा वर्कर्स , गट प्रवर्तक कर्मचारी संघटनेतर्फे
आमदार यड्रावकर यांना निवेदन

शिरोळ / प्रतिनिधी

आरोग्य मंत्री प्रा डॉ तानाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली
झालेल्या बैठकीत आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियनने केलेल्या मागणीला सकारात्मक निर्णयाबरोबर आश्वासन मिळाले होते . आशा कर्मचायांना ७ हजार रुपये मानधन वाढ तर गटप्रवर्तकांना ६ हजार २०० रुपये वाढ , तसेच पुरवणी मागणी १० हजार रुपये , तसेच दिवाळी भाऊबीज भेट २ हजार रुपये देण्याची घोषणाही आरोग्यमंत्र्यांनी केली होती . मात्र याबाबत शासन निर्णय अद्यापही झालेला नाही. तेव्हा शासन निर्णय जाहीर करून मागण्याची अंमलबजावणी तात्काळ करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य आशा व गट प्रवर्तक कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन देण्यात आले,या शिष्टमंडळात आशा व गट प्रवर्तक कर्मचारी संघटना राज्य समन्वयक नेत्रदीपा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली माया पाटील, सुरैया तेरदाळे, सीमा पाटील, सुधा कुरणे, पुनम वायचळ, तनुजा, आरती भोसले, महादेवी पाटील, नीलम कोळी, महादेवी कोळी, अश्विनी सुतार,स्मिता शिंदे, वैशाली चव्हाण , रजनी अडसुळे, अनुपमा शिंदे, राजश्री पाटील ,तारामती भोरे , वैशाली बुबने आदि उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की , आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली आशा व गटप्रवर्तकांना विविध संघटनेच्या पदाधिकारी सोबत बैठक झाली होती . त्यामध्ये आशा वर्कर्स व गटप्रवर्तक यांचे एन एच एम समायोजन व्हावे. आशा वर्कस यांना ७ हजार रुपये मानधन वाढ, तर गटप्रवर्तकांना ६ हजार २०० रुपये वाढ देण्याबरोबरच पुरवणी मागणी दहा हजार रुपये तसेच दिवाळी भाऊबीज भेट २ हजार रुपये देण्याबाबत आरोग्यमंत्र्यांनी घोषणा केली, मात्र या घोषणेनुसार शासन निर्णय अद्यापही झालेला नाही गटप्रवर्तक यांच्या समायोजनाबाबत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांच्याद्वारे संघटने कडून दिलेल्या निवेदनावर सकारात्मक शिफारस करण्यात आली असून सर्व मागण्यांचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन आमदार राजेंद्र पाटील – यड्रावकर यांनी शिष्टमंडळाला दिले. गेल्या पाच वर्षात केंद्र सरकारकडून कोणतीच मानधन वाढ झाली नाही याबाबत पाठपुरावा करू तसेच आशा ना स्मार्टफोन किंवा टॅब ,रिचार्ज ऑनलाइन कामाचे मानधन देण्याबाबत पाठपुरावा करू असे आश्वासन आम यड्रावकर यांनी दिले असल्याची माहिती नेत्रदीपा पाटील यांनी सांगितले .

Spread the love
error: Content is protected !!