हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक,श्री.बुवाफन महाराज उत्सव व हजरत नुरखान बादशाह उरूस

हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक,श्री.बुवाफन महाराज उत्सव व हजरत नुरखान बादशाह उरूस

शिरोळ : सचिन उर्फ शशिकांत पवार शिरोळ

शिरोळ नगरीला जसे ऐतिहासिक महत्त्व आहे.तसेच येथील पुण्यभुमी ही धार्मिक..अध्यात्मिक संत महंत आणि सत्पुरुष यांच्या पदस्पर्शाने शुभ आशीर्वादाने पावन झालेली आहे.
या पुण्यभूमीत साक्षात श्रीदत्तावतार श्रीमंन नृसिंह सरस्वती महाराज श्री बुवाफन महाराज श्री हजरत नूरखान बादशहा

अशा अनेक सत्पुरुष यांच्याबरोबर या भूमीत विठ्ठल भक्त पारायण ह.भ.प. बाबासाहेब आजरेकर श्री हभप विठ्ठल भक्त पारायण वास्कर आबा महाराज श्रीयुत ह भ प आजरेकर फड प्रमुख विठ्ठल भक्त माऊली श्रीयुत संत तुकाराम काळे महाराज आशा अनेक पुण्यवंत माणसानी ही भूमी आपल्या पदस्पर्शाने” पुण्य भूमी “म्हणून साकारलेली आहे.

आणि यापैकीच शिरोळ नगरीचे ग्रामदैवत म्हणून प्रसिद्ध असलेले अतिशय जागृत आणि भक्तांचे श्रद्धास्थान असलेले “श्री बुवाफन महाराज व हजरत नूरखान बादशाह”यांचा उत्सव आणि उरूस सालाबाद प्रमाणे मोठ्या भक्तिभावाने साजरा होत आहे.

शिरोळ येथील श्री बुवाफन महाराज उत्सव आणि श्री हजरत नूरखान बादशाह उरूस म्हणजे हिंदू मुस्लिम बांधव यांच्यातील ऐक्याचे आणि सलोख्याचे प्रतीकच होय याविषयी आमच्या शिरोळ नगरीचे कै.श्रीयुत द.आ.माने गुरुजी म्हणतात “शिरोळ ग्रामी थोर इतिहास घडला.

सत्पुरुष बुवाफन महाराजांचा भक्तीचा डंका झडला.सर्व धर्मियांनी उरूस साजरा होऊ लागला देशाच्या एकात्मतेचे प्रतीक हो झाला.कार्तिक पौर्णिमा नंतर येणाऱ्या सोमवारी या उरुसाची सुरुवात होते. उरुसाच्या पहिल्या दिवशी “गंधरात्र” म्हणून श्री.बुवाफन महाराजांचे पूर्वापार आणि पारंपारिक सेवा व देखभाल करणारे लिंगायत धर्माचे

श्री वेदांत चार्य शिरोळ भूषण परम पूज्य ष. भ्र. श्री.१०८ डॉ. शिवयोगी गुरु महंत पट्ट देवगुरु महास्वामी समस्त हिरेमठ परिवार समस्त माळी समाज परिवार दिवटी धरणारे समस्त माने परिवार मानाचे सर्वच मानकरी यांच्या शुभ हस्ते सनई ताशा मंगल वाद्यांच्या निनादात आकर्षक नेत्रदीपक आतश बाजीच्या वातावरणात

मानाचा गलीफ वाजत गाजत मिरवणुकीने जावून महाअभिषेक गंध लेपण महाराजांच्या समाधीला या “गंधरात्री” दिवशी केले जाते.या उरुसानिमित्त सलग चार दिवस उत्सव समिती मार्फत वेगवेगळ्या स्पर्धा प्रदर्शन शर्यती करमणुकीचे कार्यक्रम मोठ्या उत्साहाने होतात.

आमच्या शिरोळ नगरीची श्री बुवाफण महाराजांची पंढरी ही आकर्षक व नेत्रदीपक अशा विद्युत रोषणाईने तसेच फटाक्यांची आतषबाजी खेळणे वाले आणि मित्रपरिवार पै. पाहुणे यांच्या गर्दीने फुलून जाते.श्री बुवाफन महाराज म्हणजे शिरोळ वासियांचे ग्रामदैवत गावच्या उत्तर दिशेस महाराजांचे समाधी स्थान आहे.या समाधीवर शिवलिंग आहे.

व त्यांच्या समाधीसमोरील नंदीची नित्य बेल व पुष्प भस्म.हळद कुंकू तांदूळ वाहून पूजा होते.समाधीसमोर पादुका असून ही समाधी नेहमी भगव्या वस्त्राने (गलीफाने ) आच्छादलेली असते. मतप्रवाह असा आहे की बुवाफन म्हणजे फरीद ते जन्माने मुस्लिम पण शिवभक्त होते.

फरीदची आई जास्तीत जास्त वेळ ईश्वर नामस्मरणात घालवत असे.आपल्या सुनेने संसार करावा.अशी तिच्या सासू-सासर्‍यांचे अपेक्षा होती.तिने भक्ती मार्ग स्वीकारून संसाराला रामराम ठोकला व ईश्वर चिंतनासाठी एकांतात निर्जन स्थळ शोधू लागली.तिने केलेला अल्पशा संसाराचा प्रसाद म्हणून तिला गर्भधारणा झाली होती.

घनदाट अरण्य आणि पंचगंगा पवित्र नदीकाठचे शिरोळ हे ठिकाण तिने ईश्वर चिंतनासाठी निवडले आणि ती ईश्वराचे नामस्मरण करू लागली.दरम्यान तिने एका पुत्ररत्नाला जन्म दिला.त्याचे फरीद नाव ठेवले फरीद मोठा झाला.आई एकाकी जंगलात जगत असलेले जीवन फरीदला पसंत नव्हते.

आई त्याला सांगत असे की “देवदर्शनासाठी येथे उपासना करीत आहे.देव दर्शन होत नाही तोपर्यंत आपण तिथेच राहायचे”आई खडतर तपश्चर्या करीत असून देव प्रसन्न होत नाही. हे पाहून फरीदने स्वतः उग्र तपश्चर्या सुरू केली.या तपश्चर्येत देहदंड उलटे, टांगून घेणे,सभोवताली अग्नी पेटवून अखंड नामस्मरण करणे,या तपांचा समावेश होता.

या खडतर तपश्चर्येनंतर ईश्वराने माय लेकाना दर्शन दिले.आणि फरीदला वाच्या सिद्धी प्राप्त झाली. तो बोलेल त्याप्रमाणे घडू लागले.पण घडत असलेले त्याला समजत नव्हते.त्यामुळे त्याचे एका पतीवर्ता महिलेकडून गर्वहरण झाले.

तेव्हापासून देवाने दिलेल्या वाचा सिद्धीचा उपयोग तो मानवाच्या कल्याणासाठी करू लागला.भक्तगणांची संख्या वाढू लागली.बाबा फरीद हे नाव जाऊन”बुवाफन बाबा”या नावाने तो ओळखू लागला.आईच्या निधनानंतर त्याने आपले वास्तव्य दर्ग्यात सुरू केले.त्यामुळे त्यांच्या भक्त गणा मध्ये हिंदू-मुस्लीम असे सर्वच धर्माचे लोक होते.

देवाने वाचासिद्धी दिल्यामुळे यांच्याकडे भक्तांचा ही मोठा ओढा सुरू झाला.यांच्या सेवेसाठी हिंदू-मुस्लीम या धर्मातील लोक अहोरात्र सोबत असायची यापैकीच एक ज्यांनी आपली पूर्ण हयात या श्री बुवाफन महाराजांच्या साठी तत्पर सेवा अपार भक्ती आणि अतिशय श्रद्धेने सेवा करीत असलेले “श्री शंभो आप्पा “होय.आणि याच श्री शंभो आप्पांची समाधी सुद्धा श्री बुवाफन महाराजांच्या समाधी शेजारी पाहायला मिळते

अखेरीस लोकसेवा करून भक्तांचे मानव कल्याण करून शिरोळच्या उत्तरेस गावचे संरक्षण करण्यासाठी संकटाचे निर्मूलन करण्यासाठी श्री वल्ली बुवाफन तथा बुवाफन महाराज.श्री बाबय्या स्वामी महाराज यांनी समाधि घेतली या महाराजांच्यावर शिरोळ आणि पंचक्रोशीतील सर्व धर्माचे व जातीचे लोक अतिशय भक्तिभावाने श्रद्धेने भक्ती करतात

या श्री बुवाफन महाराजांच्या उत्सवाबरोबर शिरोळ गावच्या पश्चिमेला असलेला आणि इतिहासाची आणि धार्मिक घटनांची साक्ष देणारा “श्री हजरत नूरखान बादशहा यांचा गोल घुमट”मोठ्या दिमाखात उभा आहे.आणि या घुमोट परिसरात आपल्याला काही समाधी दिसतात

आणि या समाधी वरती “हिरवी चादर (गलिफ)फुलांची चादर ” दिवटयाची आरास सर्व जातिधर्मांच्या लोकाकडून वाजत गाजत गोड नैवेद्य म्हणून मलिदा आणि दुधाचा दाखविला जातो सर्व जातीधर्माच्या लोकांकडून त्यांची भक्तीभावाने पूजा केली जाते.या अखंड पश्चिम महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात होत

असलेल्या उरुसाचे नियोजन आणि आयोजन करण्यासाठी विजया दशमी दसऱ्यादिवशी शिरोळ मधील तरुण मंडळांना लकी ड्रॉ पद्धतीने संधी दिली जाते.उत्तम नियोजनाखाली हा उरूस मोठ्या उत्साहाने आणि श्रद्धेने पार पाडतात.

अश्या या आमच्या ग्रामदैवत” श्री बुवाफन महाराज व हजरत नूरखान बादशहा “यांच्या उरुसानिमित्त त्यांच्याकडे एकच मागणे या भूमीवर आलेले महाभयंकर असे कोरोना महामारीचे संकट,महापूर अशा अनेक नैसर्गिक,अनैसर्गिक संकटा मधून सर्वच मानवांचे संरक्षण करावे हीच शिरोळकर नगरी च्या वतीने अतिशय मनःपूर्वक भक्तिपूर्वक प्रार्थना आणि साष्टांग दंडवत .!!
!! श्री बुवाफन महाराज की …दोस्त…यारो.. धिंन…!!

Spread the love
error: Content is protected !!