तुम्हाला माहित आहे का? नारळातील औषधी गुण,स्वास्थ्य व सौंदर्यासाठी लाभदायक

सद्याच्या धावपळीच्या युगामध्ये अनेकांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे.त्यामुळे अनेक आजारांना लोकांना सामोरे जावे लागत आहे. मात्र आयुर्वेदामध्ये अनेक औषधांचा व उपायांचा उल्लेख केला आहे.आज आपण जाणून घेणार आहोत.

नारळात अनेक औषधी गुण आहेत.ओल्या नारळामधील गराचा वापर सौंदर्य प्रसाधनामध्येही केला जातो.नारळ पाण स्वाथ्यासाठी पौष्टीक असते.कार्बोहाइड्रेट,प्रोटीन, मिनरल्स,व्हिटामिनअसे सर्व पोषक घटके नारळापासून मिळतात.जर तुम्हाला भूक लागली तर जेवणाला पर्याय म्हणूनही तुम्ही खोबरे खाऊ शकतात.

नारळात फायबर्स मोठ्याप्रमाणात आढळतात.अपचण,छातीत जळजळीचा त्रास असणार्‍यांनी नारळाचा गर सेवन केल्यास लवकर आराम मिळतो.नारळ पाणी पोटाचे विकार दूर करण्‍याचे काम करते.अल्सरसारखा आजार बरा होतो.किडनी, थायरॉइड,डायबिटीज व मुत्राशयाचा विकार असलेल्या लोकांनी नारळ पाणी सेवन करावे.

नारळात अनेक व्हिटामीन असतात ते पचनास फार लाभदायी असतात.पोट दूखत असल्यास किंवा गॅस झाल्यास नारळ पाणी प्यावे.नारळ पाण्याने उलटीही थांबते.नारळ खोकल्यावर एक रामबाण उपाय आहे.नारळाच्या दूधात एक चमचा खसखस आणि एक चमचा मध मिसळून रोज रात्री पिल्याने फायदा होतो.

तोंडात फोड असल्यास ओले नारळाचे खोबरे चावून खावा आणि जास्तीत जास्त नारळ पाणी प्या लवकर आराम मिळेल
आंबट दही, मुलतानी माती आणि खोबरेल तेल एकत्र करून लावल्यास केस चमकदार होतात.दररोज दोन-तीन नारळाचे पाणी सेवन केल्यास चेहरा उजळतो.

थंडीत रोज रात्री सुखे खोबरे खावे.रात्री झोपताना चेहरा,मान आणि त्वचेवर खोबरेल तेल लावून हाताने हळूवार मसाज करावी. सकाळी उठल्यावर पाण्याने चेहरा धुऊन घ्यावा. काही दिवसातच सुरकुत्या नाहीशा होतील.नारळाचा गर चेहर्‍यावर लावल्याने,चेह-यावरील काळे व्रण नाहिसे होतात.

गर्भवती महिलांनी रोज नारळाचे खोबरे खाल्याने त्यांची प्रकृती ठणठणीत व सुदृढ बाळ जन्माला येते.खोबरेल तेलात बदाम बारिक करून टाकावे.डोके दुखीवर हे तेल रामबाण औषणीचे काम करते.पोटात जंत झाल्यास रोज सकाळी किसलेले खोबरे खावे.

Spread the love
error: Content is protected !!