वृत्तपत्र हे समाज प्रबोधनाचे महत्त्वाचे साधन असून आपल्या लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून याच्याकडे पाहिले जाते असे मत श्री पद्मराजे विद्यालयाचे मुख्याध्यापक ए.ए.मुल्ला यांनी व्यक्त केले.श्री पद्माराजे विद्यालयामध्ये पत्रकार दिन मोठ्या उत्साहात सं
पन्न झाला.यावेळी मुल्ला बोलत होते.प्रारंभी मराठी वृत्तपत्र सुष्टीचे जनक आद्यपत्रकार श्री बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ पत्रकार सुनील इनामदार यांच्या हस्ते करण्यात आले.मुख्याध्यापक मुल्ला पुढे म्हणाले शिरोळ शहरातील पत्रकार बांधवांचे विद्यालयाला नेहमी सहकार्य असते त्यामुळेच विद्यालयाच्या विविध शालेय उपक्रमांचे जिल्हास्तरावर दखल घेतल्याने विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळत आहे.यापुढेही पत्रकार बांधवांचे सहकार्य रहावे असे आवाहन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अविनाश माने यांनी केले.यावेळी सर्व पत्रकार बांधवांचा विद्यालयाचे मुख्याध्यापक मुल्ला यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी संपादक विजय पवार,पत्रकार बाळासो माळी आनंदा शिंगे,सुनील इनामदार,सुरेश कांबळे, दगडू माने,संदीप बावचे,चंद्रकांत भाट,मदन गावडे,बाळासो कांबळे,अविनाश सूर्यवंशी, संदीप इंगळे दीपक महानाम,सुभाष गुरव उपमुख्याध्यापक टी आर गंगधर,व्ही.ए.गवंडी, एस.डी.आरगे,आर.टी.