पुलाची शिरोली / कुबेर हंकारे
पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या श्री दत्त ऑटो गॅरेजमध्ये शाॅर्ट सर्किट होऊन लागलेल्या आगीत गॅरेचे व मालाचे लाखोचे नुकसान झाले हि आग शुक्रवारी रात्री ८ वाजण्यासुमार लागली घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळेवर येवुन आग आटोक्यात
आणली.नागांव हद्दीत श्री दत्त ऑटो गॅरेज हे गेली तीन वर्षांपासून सुभाष बिडकर यांच्या जागेत भाड्याने असून येथे ट्रक सारख्या आवजड वाहणांची रिपेरिंग व त्यासाठी लागणारे स्पेअर्स पार्टस व ऑईल विक्रीसाठी ठेवण्यात आले होते.गॅरेज मालक महेश घाटगे व त्यांचे अन्य दोघे
पार्टनर व कामगार हे गॅरेज बंद करून घरी निघून गेले असताच काहीच वेळात गॅरेजमध्ये शाॅर्ट सर्किट होऊन आग लागली बघता बघता आगीने रौद्र रूप धारण करून आगीचे धुराचे लोट गॅरेज बाहेर निघून लागल्याने लोकांच्या निर्दशनास आल्यावर त्यानी गॅरेज मालक व
जागा मालक याना कल्पना देत आग विझवण्यासाठी कोल्हापूर व पेठ वडगाव आग्नी बंबास बोलावले गॅरेजमध्ये ऑईलचे कॅन,वायर, केबली,कागदी पुट्टे, मोटरसायकल अन्य साहित्य आत असल्याने आग आटोक्यात येत नसल्याने दोन्ही अग्निशमन बंबचा वापर
करण्यात आला. आग लागली तेव्हा गॅरेजमध्ये असलेल्या मोटरसायकलचा मोट्याने स्फोट झाल्याने आग गॅरेजमध्ये सर्वत्र पसरली.गॅरेज हे पुर्णपणे पत्र्याच्या शेडचे असून पंधरा दिवसापासून गॅरेजच्या वरील पत्र्यास विजेचा करंट बसत असल्याचे जानवत होते. पण याकडे कोणीच लक्ष
दिले नाही वेळेवर विजेच्या वायरिंग तपासून पाहीले असते तर हि अनर्थ घटना घडली नसती असे येथील काही नागरिक बोलत होते. वेळीच आग आटोक्यात आल्याने पुढील मोठा अनर्थ टळला.