हरण्या व बाशिंग भवरा याने मारलं शिरोळचे मैदान

हरण्या व बाशिंग भवरा याने शिरोळचे मैदान जिंकले
जनरल दुबैली गाड्यांच्या शर्यतीत पप्पू संकपाळ तर ब गटात पप्पू पाटील आणि सचिन संकपाळ यांच्या बैलगाडी तर जनरल घोडागाडीमध्ये आलिया शेख यांची घोडागाडी प्रथम

श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नुरखान बादशाह उरसानिमित्त आयोजित शर्यती उत्साहात

शिरोळ / प्रतिनिधी

 

हजारो शर्यती शौकिनांच्या उपस्थितीत झालेल्या शिरोळच्या मैदानात हिंदकेसरी हरण्या व बाशिंग भवरा या बैलजोडीने वाऱ्याचा वेग धरीत शिरोळचे मैदान जिंकून यशाची परंपरा कायम राखली येथील ग्रामदैवत श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह

 

उरसानिमित्त आयोजित केलेल्या गावातील जनरल बैलगाडी शर्यतीमध्ये पप्पू संकपाळ यांच्या हिंदकेसरी हरण्या व बाशिंग भवरा या बैलगाडीने व जनरल बैलगाडी ब गटातील शर्यतीत पप्पू पाटील व सचिन संकपाळ यांच्या बैलगाडीने तर जनरल घोडागाडी शर्यतीमध्ये

 

आलिया शेख यांच्या घोडा गाडीने प्रथम क्रमांक मिळवला विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.सोमवार दिनांक ४ डिसेंबर ते शुक्रवार ८ डिसेंबर २०२३ या कालावधीत ग्रामदैवत श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह उरूस अमाप उत्साहात पार पडला यावर्षी उत्सव आणि उरूस साजरा

 

करण्याचा मान संभाजीनगर येथील पवनपुत्र मित्र मंडळास मिळाला मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी उत्सव व उरसाचे नेटके नियोजन केले होते उरुसाच्याअगोदर चार दिवस शिरोळ परिसरात मोठा पाऊस झाला होता यामुळे घोडागाडी व बैलगाडी शर्यतीसाठी तयार केलेल्या मैदानावर चिखल झाला होता.

 

यामुळे उत्सव आणि उरसानिमित्त आयोजित केलेल्या घोडागाडी व बैलगाडी शर्यती स्थगित करण्यात आल्या होत्या सदरच्या शर्यती बुधवारपासून शासनाच्या अटी शर्ती आणि सर्वोच्च न्यायालयाच्या नियमानुसार विना लाठी विनाकाठी शर्यती येथील मिठारगी शेतजमीन कनवाड रस्ता येथे घेण्यात आल्या.

 

आज शुक्रवारी जनरल बैलगाडी अ गट जनरल बैलगाडी ब गट आणि जनरल घोडागाडी शर्यती उत्साहात पार पडल्या या शर्यती पाहण्यासाठी शर्यतीशौकीन आणि नागरिक मिठारगी कनवाड रस्ता येथे मोठ्या संख्येने उपस्थित होते शर्यतीमध्ये सहभागी सर्व बैलांची उत्सव व

 

उरुस समितीच्यावतीने आरोग्य तपासणी करण्यात आली यासाठी पशुवैद्यकीय कक्षाने विशेष परिश्रम घेतले
मान्यवरांच्या हस्ते शर्यतीचा शुभारंभ करण्यात आला
प्रथमता ब गटातील जनरल बैलगाडी सोडण्यात आल्या या शर्यतीसाठी २२ बैलगाड्यांची नोंद झाली होती

 

यामुळे एका गटात ११ व दुसऱ्या गटात ११ बैलगाड्या करून दोन गटात या शर्यती सोडण्यात आल्या या शर्यतीमध्ये पहिल्या गटात प्रथम – पप्पू पाटील (शिरोळ) द्वितीय – बंडा पवार (कुटकोळी) तृतीय – संजय शेमडे (आगळगाव)

 

 

दुसऱ्या गटातील बैलगाडी शर्यतीत प्रथम – सचिन संकपाळ (शिरोळ) द्वितीय – आनंदा संकपाळ (शिरोळ) तृतीय – गजानन गावडे (शिरोळ) यांच्या बैलगाडीने अनुक्रमे यश मिळवले यानंतर जनरल घोडागाडी शर्यती झाल्या.

 

 

या शर्यतीमध्ये प्रथम – आलिया शेख (शिरोळ) द्वितीय – साजिद शेख (शिरोळ) तृतीय – उदय जगदाळे (शिरोळ) यांच्या घोडागाडीने यश मिळवले.यानंतर जनरल दुबैली गाड्यांच्या शर्यती सोडण्यात आल्या यामध्ये कोल्हापूरचा हिंदकेसरी हरण्या म्हैशाळचा बाशिंग भवरा सलगर येथील सलगर सुंदऱ्या परिते पोलीस हरण्या

 

 

कंकणवाडीचा हिंदकेसरी बुजार हरण्या म्हैशाळचा पाखऱ्या अशा अनेक नामवंत बैल या शर्यतीमध्ये सहभागी होते यामुळे अत्यंत चुरशीने या शर्यती पार पडल्या जनरल दुबैली गाड्यांच्या शर्यतीमध्ये प्रथम – पप्पू संकपाळ – शिरोळ(हिंदकेसरी हरण्या व बाशिंग भवरा) द्वितीय – अनुज भोसले – शिरोळ(हिंदकेसरी बुजार हरण्या

 

 

 

व सलगर सुंदऱ्या) तृतीय – आनंदा संकपाळ – शिरोळ (परिते पोलीस हरण्या व म्हैशाळचा पाखऱ्या) यांच्या बैलगाडीने या मैदानात विजय मिळवला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजयी स्पर्धकांना मानाचे निशाण रोख रक्कम कायम चषक आणि शिल्ड पारितोषिक म्हणून देण्यात आले दरम्यान शर्यतीचे उत्कृष्ट नियोजन

 

 

केल्याबद्दल युवा नेते पृथ्वीराजसिंह यादव विजय आरगे उरूस समितीचे अध्यक्ष बाळासाहेब जगदाळे यांचा शर्यती प्रेमींच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच शर्यतीसाठी परिश्रम घेतलेल्या सर्व पंचांचा सन्मानचिन्ह देऊन उत्सव व उरुस समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

 

 

यावेळी शासकीय अधिकारी पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्यासह युवानेते पृथ्वीराजसिंह यादव दरगू गावडे पंडित काळे विजय आरगे उत्सव व उरूस संयोजन समितीचे अध्यक्ष बाळासाहेब जगदाळे पंच कमिटीचे रावसाहेब देसाई धनाजी पाटील नरदेकर संभाजी जगदाळे बाळासाहेब गावडे धनपाल कनवाडे जयसिंगराव देसाई नायकू गावडे बाशु नाईकवडे भालचंद्र ठोंबरे सिताराम शिंदे चंद्रकांत भाट उमेश माने रविराज जगदाळे

 

 

 

संदीप चुडमुंगे विजयसिंह माने देशमुख प्रकाश गावडे दिलीप संकपाळ डॉ आदेश गावडे प्रवीण इंगळे सूर्यकांत संकपाळ विजय माने रवींद्र गावडे अजित चुडमुंगे विकी शिंदे तुषार पाटील प्रशांत जाधव प्रसाद संकपाळ धीरज शिंदे अर्जुन जाधव अजय सावंत ओंकार गावडे किरण गावडे वर्धन रजपूत निलेश गावडे सागर भाट

 

 

अनिस चौगुले संकेत सावंत विनायक पवार अनिरुद्ध कोळी यांच्यासह सर्व पंच श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह उरूस संयोजन समितीचे सर्व पदाधिकारी सदस्य कार्यकर्ते आणि शर्यती शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले .

Spread the love
error: Content is protected !!