वर्षाअखेरला दत्तधाममध्ये गुंजला नवनाथ भक्तीसार

नृसिंहवाडी / प्रतिनिधी

नृसिंहवाडी दत्तधाममध्ये हजारो सेवेकर्‍यांच्या उपस्थितीत एकदिवसीय सामुहिक चाळीस अध्यायाचे नवनाथ भक्तीसार वाचन करुन सरत्या वर्षाला भक्तीमय वातावरणात निरोप देण्यात आला.संपुर्ण जगात
वर्षाअखेरला निरोत देताना विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.कोणी जेवणाची पार्टी,कोणाची डान्सपार्टी,सर्वत्र हाॅटेल,ढाबे फुल्ल आहेत.जो तो वर्षाचा शेवटचा दिवस मजेत एॅन्जाय करतात.मात्र आखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ,त्र्यंबकेश्वर नाशिक
यांच्या मार्गदर्शनाखाली श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील श्री स्वामी समर्थ दत्तधाम मध्ये एकदिमसीय सामुहिक श्री नवनाथ भक्तीसारचे सामुहिक वाचन करण्यात आले.
या एकदिवसीय नवनाथ भक्तीसार पारायणास कोल्हापुरसह सांगली,सातारा,पुणे,मुबंई,नाशिक,
लातुर,रत्नागिरी,बेळगाव आदी भागातुन सुमारे आठशे सेवेकरी उपस्थित होते.आज नविन वर्षाच्या पूर्वसंध्येला दत्तधाममध्ये सामुहिक एकदिवसीय श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र पारायण वाचन करुन 2023 वर्षाला निरोप व 2024 नविन वर्षाचे स्वागत करण्यात येत आहे.
Spread the love
error: Content is protected !!