जयसिंगपूर/ प्रतिनिधी
येथील श्री स्वामी समर्थ दरबार मंदिरात दत्त जयंती निमित्त अखंड नाम यज्ञ याग आणि श्री गुरुचरित्र पारायणाची सांगता व श्री दत्त जन्मकाळ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.यावेळी जयसिंगपूर शहरासह पंचक्रोशीतील हजारो सेवक सेविकांसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.शहरातील लक्ष्मीबाई पाटील गर्ल स्कूल नजीक असलेल्या श्री स्वामी समर्थ दरबार मंदिरात दत्त जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्वामी याग चंडी याग मल्हार याग गणेश याग याबरोबर अभिषेक नित्य स्वाहाकार आरती याबरोबर श्री गुरुचरित्र पारायण वाचन आणि धार्मिक सांस्कृतिक आणि भजनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.अतिशय सुंदर आणि नेटक्या नियोजनात आणि भक्तीपूर्ण वातावरणात हा संपूर्ण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.दत्त जन्मोत्सव सोहळ्या दिवशी जन्मकाळ सोहळा सर्वांना पाहण्याकरिता मंदिर परिसरात ठिकठिकाणी LED स्क्रीनवर लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले होते. महाप्रसाद गुरुचरित्र वाचन आणि पालखी सोहळा कार्यक्रमाची सांगता झाली.
दत्त जन्मोत्सव सोहळ्यासाठी शिरोळ तालुका बरोबर इचलकरंजी हातकलंगडे परिसरातील हजारोचे संख्येने भावीक उपस्थित होते.