कवठेसार येथे भहुमार या शेतात शॉर्ट सर्किटने बारा एकर उसाचे क्षेत्र जळून खाक झालेने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांची नुकसान झाले.संदीप नांद्रेकर यांच्या क्षेत्रात पंचगंगा साखर कारखान्याचे मशीनच्या साह्याने ऊसतोड चालू होती.दरम्यान नदीजवळील एम एस ई बी च्या लोंबत्या तारांचे एकमेकांना वाऱ्यामुळे स्पर्श झाल्याने ठिणग्या पडल्याने तारा खाली असलेल्या उसाने पेट घेतला.वारा जोराचा असल्याने अवघ्या २० मिनटात १२ एकर ऊस क्षेत्र जळून खाक
झाले.ऊस तोड मशीन ऑपरेटर ला काही अंतरावर असलेल्या प्लॉट मध्ये ऊस पेटत असल्याचे दिसल्यावर तातडीने प्रसंगावधान राखत मशीन सह सर्वच ट्रॅक्टर चालकासह उसाच्या प्लॉट बाहेर काढले.सरपंच पोपट भोकरे यांनी शरद कारखान्याचे अग्निशामक दलाची गाडी पाचारण करून व गावातील तरुणांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात यश आले व पुढील जळणारे ऊस क्षेत्र व शेत घर वाचले.जळालेल्या ऊस क्षेत्रातील शेतकऱ्याची नावे व क्षेत्र पुढीलप्रमाणे संदीप नांद्रेकर (पावणे तीन एकर),विकास पाटील(अर्धा एकर),शंकर पाटील (1एकर), विजय पाटील(2एकर), प्रकाश पाटील(२एकर), राजेंद्र नांद्रेकर(1एकर), शांतीनाथ नांद्रेकर (1एकर), आदिनाथ नांद्रेकर (१एकर) असे पंचगंगा, जवाहर,शरद,दत्त कारखान्याचा १२ एकर ऊस जळून खाक झाला.यावेळी घटना स्थळी संतोष भोकरे,मनू पाटील,सर्जेराव गाडवे यांच्यासह शरद अग्निशमन दलाचे फायरमन सुशीलकुमार मोहिते व स्वनिल खाडे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जळालेल्या उसाचा पंचनामा होऊन कवठेसार परिसरातील वीज वितरण कंपनीच्या लोंबकळत असलेल्या वीज तारांमुळे शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीची भरपाई मिळावी आणि लोंबकळत असलेल्या तारांचे दुरुस्ती लवकरात लवकर व्हावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.