दत्त कारखानास्थळी ऊसतोड मजुरांची आरोग्य तपासणी

शिरोळ / प्रतिनिधी
दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना चॅरिटेबल ट्रस्टचे आरोग्य केंद्रास चेअरमन उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी सर्व सोयीसुविधा अद्ययावत मशनरी उपलब्ध करुन
दिल्या आहेत.
उच्चविद्याविभूषित व तज्ञ डॉक्टरांमार्फत आरोग्य केंद्रात सर्वरोगांवर २४ तास उपचार  देण्यात येतात.आरोग्य केंद्रात चीफ मेडिकल ऑफिसर डॉ.रेखा शेरबेट आहेत. मेडिकल ऑफिसर डॉ.प्रिया खाडे या स्त्रीरोग व प्रसुती
तज्ञ आहेत.मेडिकल ऑफिसर डॉ.गजानन चौगुले हे अस्थीरोग तज्ञ व असि.मेडिकल ऑफिसर डॉ.कुमार पाटीलव सर्व पॅरामेडिकल, स्टाफ हे वैद्यकीय सेवेसाठी सज्ज असतात.साखर कारखान्यात यावर्षीचे ऊस गाळप
सुरू असुन त्यासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील ऊसतोड मजुर मोठया संख्येने कारखाना कार्यस्थळावर व इतर भागात दाखल झाले आहेत.साखर आयुक्त कार्यालय पुणे यांच्या २०/०६/२०२३ च्या परिपत्रकानुसार
ऊसतोड मजुरांची महिन्यातुन एकदा आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे.त्यासाठी वैद्यकीय पथक दत्त आरोग्य केंद्रात स्थापन करण्यात आले आहे.कार्यकारी संचालक एम.व्ही.पाटील,मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगान्ना,आरोग्य व शिक्षण संचालक अंबाप्रसाद
नानिवडेकर,चीफ मेडिकल ऑफिसर डॉ.रेखा शेरबेट यांच्या नेतृत्वाखाली फिरते वैद्यकीय पथक कार्यरत झाले आहे.त्यामध्ये सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ.कुमार पाटील,किशोर कांबळे,श्रीकृष्ण खोंद्रे, श्रीकांत निर्मळे, सिकंदर  यांचा समावेश करण्यात आला आहे.
या पथकाने मजुरांच्या खोपटावर जाऊन आरोग्य तपासणी सुरू केली आहे.त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.मजुरांची सर्वांगिण आरोग्य तपासणी करून योग्य सल्ला देण्यात येत आहे.
Spread the love
error: Content is protected !!