नागीण (Herpes zoaster )-
हा एक अतिरिक्त उष्णतेमुळे होणारा आजार आहे. याचा कालावधी 2-3आठवडे असतो, पण याच्यावर योग्य उपचार न झाल्यास खूप काळ याचा त्रास होतो.
कारणे -अति उष्ण, पित्तकारक आहार, तेलकट -मसालेदार पदार्थ, जागरण, ईर्षा, राग यामुळे हा आजार उत्पन्न होतो.
लक्षणे – द्राक्षसारखे पाण्याने भरलेले फोड उठतात, तेथे दाह होतो, वेदना होतात,ताप येतो,ती जागा लाल होते, योग्य उपचार न झाल्यास तेथील नस खराब होते.
अपथ्य (काय खाऊ नये )-
दारू, तंबाखू नॉनव्हेज,पापड, लोणचे, मिरची, तिकट, दही, खर्डा, गव्हाचे अन्न, मुळा, अळू, शेंगदाणे, वाळलेले खोबरे, पोहे, काजू, तूर डाळ, मोहरी,मका, बाजरी,लवंग, काळी मिरी, चहा.
पथ्य (काय खावे )-
ज्वारीच्या कन्या, लाह्या, मुगडाळ, सब्जा, लिंबू, मोसंबी, संत्री, दूध, लोणी, तूप, ताक, सफरचंद, चिकू, पेरू, काकडी, बिट, गाजर, ज्वारीची /तांदळाची भाकरी, भात, दुधीभोपळा, पडवळ, दोडका, भेंडी, गवारी, घेवडा, शेवगा, कारले,मनुके पालेभाज्या, नारळ पाणी, गव्हांकुर रस.
आयुर्वेदिक औषधे –
विरेचन कर्म, सारिवाद्यासव, परिपा्ठादी काढा,उशिरासव, पंचतिक्त घृत
उपाय –
१) सारिवा, वाळा, त्रिफळा,यस्टीमधू, गुडूची,मंजिष्ठा, कर्पदक भस्म, प्रवाल पंचामृत रस या सर्वांचा काढा करून पिणे.
२) हराटिचा रस 1ग्लासभर पिणे.
३) त्या जागेला शतदौत घृत लावणे.
४) त्या जागी वाळा, कडुनिंब,लोणी,चंदन,हराटी, तांदुळाचे धुवन यांचा लेप लावणे.
५) सब्जा सरबत /वाळा सरबत पिणे.
६) मोरआवळा खाणे.
७) लिंबूचा आहारामध्ये जास्तीत जास्त वापर कारणे.
डॉ. ओंकार निंगनुरे
संपर्क -9175723404,7028612340