पुलाची शिरोली येथे कल्याण मटका अड्ड्यावर पोलिसांची कारवाई; १६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त
पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
पुलाची शिरोली येथे मोबाईलवर कल्याण मटका जुगार घेणाऱ्या एकावर शिरोली एमआयडीसी पोलिसांनी कारवाई करून त्याला ताब्यात घेऊन पोलिसांनी १६५० रुपये रोख व मटक्याचे साहित्यासह मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई गुरुवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिरोली पुलाची येथील शिरोली फाटाजवळील खाऊ गल्ली परिसरातील न्यू बहार हॉटेलच्या मागील आडोशाला आरोपी अनिल मधुकर मोरे (वय ५५, रा. कंदलगाव, कमानी जवळ, ता. करवीर, जि. कोल्हापूर; मूळ रा. २१/१०४५, स्वामी अपार्टमेंट रोड, जवाहरनगर, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) हा मोबाईलवर कल्याण मटका नावाचे आकडे घेऊन ते पांढऱ्या कागदावर लिहीत होता. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी लोकांकडून पैसे घेऊन तो हा जुगाराचा खेळ चालवत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
त्याच्याकडून पोलिसांनी १६५० रुपये रोख रक्कम मटका आकडे असलेला पांढरा कागद आणि निळ्या शाईचा बॉलपेन, असा एकूण १६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबतची फिर्याद पोलीस हेडकॉन्स्टेबल सुहास मधुकर संकपाळ यांनी दिली आहे.तर पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल पवार करत आहेत.