मौजे वडगावच्या सुजल दिवेकरची राज्य अजिंक्य कबड्डी स्पर्धेसाठी निवड!

Spread the love

पालघर येथे रंगणार कुमार ५३ वी राज्य अजिंक्य कबड्डी स्पर्धा; वडगाव क्रीडा मंडळाच्या शिरपेचात मानाचा तुरा

पुलाची शिरोली प्रतिनिधी / कुबेर हंकारे

येथील वडगाव क्रीडा मंडळाचा खेळाडू सुजल भीमराव दिवेकर (संचित) याची पालघर येथे होणाऱ्या कुमार ५३ व्या राज्य अजिंक्य कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याच्या या निवडीमुळे मौजे वडगावसह परिसरातील क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सुजल दिवेकर याने कबड्डीच्या मैदानावर सातत्यपूर्ण सराव, उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन आणि जिद्दीच्या जोरावर आपल्या खेळाची वेगळी छाप निर्माण केली. त्याच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत त्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

पालघर येथे होणाऱ्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत राज्यातील विविध भागांतील उत्कृष्ट कबड्डीपटू सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत सुजल दिवेकरला आपल्या खेळाचे कौशल्य दाखविण्याची संधी मिळणार असून, त्याच्याकडून दमदार कामगिरीची अपेक्षा व्यक्त होत आहे.

सुजलच्या निवडीने वडगाव क्रीडा मंडळाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला असून, त्याच्या या यशाबद्दल क्रीडाप्रेमी, मित्रपरिवार, प्रशिक्षक तसेच ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंना योग्य मार्गदर्शन व संधी मिळाल्यास ते राज्यस्तरावरही आपल्या गावाचे नाव उज्ज्वल करू शकतात, हे सुजलच्या निवडीने अधोरेखित झाले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!