पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
पुलाची शिरोली ता हातकणंगले येथील लव्ह जिहादच्या एका गंभीर प्रकरणाच्या निषेधार्थ सकल हिंदू समाज, मराठा समाज आणि विविध हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या वतीने या प्रकरणातील संशयितांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. समाजात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या आणि भावना दुखावणाऱ्या कृत्यांचा यावेळी जोरदार निषेध करण्यात आला.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील संशयीत आरोपी शाहरुख देसाई आणि शाहिद सनदे यांच्या कथित व्हॉट्सअॅप चॅटमध्ये मराठों की एक भी बाई छोड़ने का नहीं अशा आशयाचे अत्यंत आक्षेपार्ह संदेश समोर आले आहेत.
या कथित संदेशांमुळे मराठा समाज आणि सकल हिंदू समाजाच्या भावना तीव्रपणे दुखावल्या गेल्या असून, संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
आंदोलन करत्यानी पोलिस प्रशासन या कथित व्हॉट्सअॅप चॅटची सायबर व तांत्रिक बाजू तपासून सखोल चौकशी करावी , चॅट सत्य असल्याचे निष्पन्न झाल्यास, आरोपी शाहरुख देसाई व शाहिद सनदे यांच्यावर समाजात तेढ निर्माण करणे, धार्मिक भावना दुखावणे आणि इतर कायदेशीर कलमांनुसार स्वतंत्र गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी , संबंधित लव्ह जिहाद प्रकरणाचा निष्पक्ष, जलद आणि प्रभावी तपास करून सर्व दोषींना कठोर शिक्षा द्यावी. अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी राहुल खवरे , निलेश शिंदे , योगेश खाडे , नितीन चव्हाण , मयूर करपे , विशाल खोचीकर , श्रीकांत कदम , शुभम पाटील , अक्षय पवार , निलेश पाटील , संतोष पोवार , योगेश नलवडे , ओंकार रंगापुरे , अक्षय पाटील , शंतनु अढाव आदींसह शिरोली गावातील हिंत्दुत्वादी कार्यकर्ते उपस्थित होते