शिरोली पुलाची येथे मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना अंतर्गत चारा बियाणे वाटप

Spread the love

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे

पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूर आणि पंचायत समिती हातकणंगले यांच्या वतीने ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना (जिल्हा वार्षिक योजना २०२६-२७)’ अंतर्गत शिरोली पुलाची ता हातकणंगले येथे चारा उत्पादन कार्यक्रम यशस्वीरित्या आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात शेतकरी हिताचा व पशुधन विकासाचा विडा उचलत लाभार्थ्यांना वैरण पिकांच्या बियाण्यांचे वितरण करण्यात आले.

पशुधनाच्या संतुलित आहाराचे महत्त्व लक्षात घेऊन राबवलेल्या या उपक्रमामुळे पशुपालकांना वर्षभर सकस हिरवा चारा उपलब्ध होणार आहे. परिणामी, जनावरांचे आरोग्य सुधारून दूध उत्पादनात वाढ होईल आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य मा. श्री. सलीम महात यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवून शेतकऱ्यांशी संवाद साधला. शासन योजना तळागाळातील प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी शिरोली पंचायत समिती सदस्य कमल कौंदाडे , नागाव पंचायत समिती सदस्य अरुण माळी तालुका पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय अधिकारी डॉ. गणेश नेवसे, तसेच पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील लोंगणे प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते शेतकरी लाभार्थ्यांना वैरण पिकांच्या दर्जेदार बियाण्यांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमाबद्दल शिरोली परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करत पशुसंवर्धन विभागाचे आभार मानले. शेतकरी हित पशुधन विकास समृद्ध ग्रामीण अर्थव्यवस्था हा उद्देश डो्यासमोर ठेवून घेतलेला हा आढावा ग्रामीण भागासाठी अत्यंत प्रेरणादायी ठरला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!