संभापुरात अवैध मद्यसाठ्यावर शिरोली एमआयडीसी पोलिसांची कारवाई; १४,५५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त

Spread the love

पुलाची शिरोली प्रतिनिधी कुबेर हंकारे 

शिरोली एमआयडीसी पोलिसांनी संभापुर येथील कमानीजवळ केलेल्या धाडीत अवैधरित्या विक्रीसाठी साठवून ठेवलेला देशी-विदेशी मद्यसाठा जप्त करत एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत एकूण १४ हजार ५५५ रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १८ जून २०२६ रोजी सायंकाळी ५.४० वाजण्याच्या सुमारास संभापुर गावातील कमानीजवळील घरावर छापा टाकण्यात आला. या कारवाईदरम्यान सावन कृष्णांत भोसले (वय ३७, रा. भोसले गल्ली, कमानीजवळ, संभापुर) याच्या ताब्यात विविध कंपन्यांच्या देशी दारू, विदेशी व्हिस्की, रम, व्होडका तसेच बिअरच्या बाटल्या व कॅन्स विक्रीच्या उद्देशाने बेकायदेशीररीत्या साठवून ठेवल्याचे आढळून आले.या छाप्यात करण संत्रा, रॉयल संत्रा, जी.एम., टँगो पंच, कृष्णा पहिली धार, मॅकडॉवेल्स, इम्पेरियल ब्ल्यू, ओल्ड मंक, डीएसपी ब्लॅक, रॉयल स्टॅग, रॉयल चॅलेंज, डॉक्टर ब्रँडी, लिटल लिटल, रोमॅनो, मुंबई माल्ट, अल्फा बुल, मास्टर डी लाईट यांसह विविध ब्रँडच्या देशी-विदेशी मद्याच्या बाटल्या तसेच किंगफिशर, लंडन पिल्सन आणि ट्युबर्ग कंपनीच्या बिअरचा समावेश होता.याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार ऋषिकेश श्रीराम पवार यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली असून पुढील तपास सुरू आहे.ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक अमित भागवत पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार ऋषिकेश पवार, महेश घाटगे, गजानन कांबळे, अभिषेक गायकवाड आदींच्या पथकाने केली. पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील अवैध मद्यविक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!