कोळी बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यात विलंब; ‘कोळी महासंघा’चे मुख्यमंत्र्यांना स्मरणपत्र

Spread the love

कोल्हापूर / दिलीप शिरढोणे

महाराष्ट्र राज्यातील विविध निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे कोळी जमातीच्या शासकीय परिपत्रकास झालेल्या विलंबाबाबत जमात बांधवांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या पार्श्वभूमीवर,’ कोळी महासंघ’ या संघटनेने मुख्यमंत्र्यांना स्मरणपत्र पाठवून तात्काळ परिपत्रक काढण्याची विनंती केली आहे. राज्यातील जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.अनुसूचित जमातीतील बांधवांना जातीचे दाखले,जात वैधता प्रमाणपत्र सुलभ रित्या मिळणे व रक्त नात्यातील समाज बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्याबाबत दिनांक २०/१०/२०२३ रोजी एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली होती. या बैठकीतील इतिवृत्ताप्रमाणे महाराष्ट्र शासनाकडून तातडीने परिपत्रक निघणे अपेक्षित होते.मात्र, विधानसभा, नगरपरिषद,महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे या परिपत्रकास विलंब झाला आहे. शासकीय परिपत्रक काढण्यास दिरंगाई झाल्याने कोळी जमातीमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार तात्काळ परिपत्रक काढण्यात यावे,अशी विनंती केली आहे. जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना दिलेल्या या निवेदनावर कोळी महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षांसह पुढील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिरगुरे, पोपट पुजारी,सुरेश कोळी,बाळासाहेब निपाणे, बाळासाहेब माने,शोभा कोळी, जगन्नाथ कोळी,सुभाष कोळी, बाळासाहेब वाळिंजकर,संजय कोळी, विनोद कोळी,विजय आरगे,भगवान कोळी,धनंजय कोळी,युवराज कोळी यांचेसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Comment

error: Content is protected !!