ग्रामपंचायतीच्या कामाचा व्हिडिओ स्टेटसवर ठेवल्याने तरुणाला हॉकी स्टीकने बेदम मारहाण; टोप येथील धक्कादायक प्रकार, ७ जणांवर गुन्हा दाखल

Spread the love

 

पुलाची शिरोली/ प्रतिनिधी कुबेर हंकारे 

टोप (ता. हातकणंगले) येथील कासारवाडी फाटा परिसरामध्ये ग्रामपंचायतीने जाहीर केलेल्या विकासकामेचा व्हिडिओ मोबाईलवर शूट करून तो सोशल मीडिया स्टेटसवर ठेवल्याच्या रागातून एका तरुणाला बेकायदेशीर जमाव जमवून हॉकी स्टीक आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना आज घडली.याप्रकरणी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गावच्या ७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबतची फिर्याद नागेश पिलाजीराव पाटील याने पोलीसात दिली आहे .पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नागेश पिलाजीराव पाटील (वय ३९, रा. कासारवाडी फाटा, टोप, ता. हातकणंगले) यांनी ग्रामपंचायतीने जाहीर केलेल्या कामाचा एक व्हिडिओ मोबाईलवर शूट केला होता. हा व्हिडिओ त्यांनी आपल्या मोबाईल फोनवर स्टेटस म्हणून ठेवला होता. मात्र, हा व्हिडिओ स्टेटसवर का ठेवला, याचा तीव्र राग मनात धरून आरोपी धनाजी बाबुराव पाटील ,भगवान शंकर भोसले,विजय आनंदा भोसले, सुनील बाबासो काटकर, सुरेश विठ्ठल भोसले, युवराज देसाई (कवठेकर) , सागर पांडुरंग पाटील (सर्व रा. भोसले खडी, टोप, ता. हातकणंगले, जि.कोल्हापूर) यानी बेकायदेशीर जमाव जमवून आज दुपारी २: ३० वाजेच्या सुमारास फिर्यादी नागेश पाटील हे कासारवाडी फाटा येथील आपल्या राहत्या घरासमोर उभे असताना आरोपींनी संगनमत करून त्यांना गाठले. तू व्हिडिओ स्टेटसवर का ठेवलास असे म्हणत आरोपींनी नागेश पाटील याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यामध्ये आरोपी धनाजी बाबुराव पाटील , सागर पांडुरंग पाटील यांनी आपल्या हातातील हॉकी स्टीकने नागेश पाटील यांच्या उजव्या पायावर व हातावर जबर मारहाण केली. या हल्ल्यात पाटील जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत आरोपींनी त्यांना जिवे ठार मारण्याची धमकी दिली.ज्यानी नागेश पाटील याना मारहाण केली ते धनाजी पाटील हे टोप गावचे सरपंच यांचे भाऊ आहेत नागेश पाटील यानी काही दिवसांपासून ग्रामपंचायतीच्या कारभार व विकास कामाची माहितीच्या आधाराखाली माहिती मागितली होती जे कामे ग्रामपंचायतीने केली नाहीत ती ग्रामपंचायतीने केला असल्याचा खुलासा केला होता पण ती कामेच पुर्ण नसताना त्याची निधी गेला कुठे याबाबत माहिती मागितली होती याचा राग मनात धरून हा वाद आज दुपारी झाला असल्याचे नागेश पाटील यानी सांगितले . सोशल मीडियावरील स्टेटस च्या कारणावरून झालेल्या या मारहाणीची परिसरात जोरदार चर्चा सुरू असून संबंधित घटनेमुळे टोप काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते .

Leave a Comment

error: Content is protected !!