पृथ्वीराजसिंह यादव,अमरसिंह पाटील आणि अशोकराव माने आले एकत्र 

Spread the love

 

१ जून रोजी शिरोळ भूषण पुरस्कार वितरण सोहळा

पृथ्वीराज यादव,अमरसिंह पाटील आणि डॉ.अशोकराव माने यांच्या उपस्थितीत नियोजन बैठक उत्साहात

 

शिरोळ / प्रतिनिधी

हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा शिरोळचे सुपुत्र दलितमित्र डॉ.अशोकराव माने यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘शिरोळभूषण’ पुरस्कार वितरण सोहळा येत्या १ जून २०२६ रोजी शिरोळ येथे उत्साहात पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर पुरस्कार निवड समितीची महत्त्वपूर्ण बैठक डॉ.अशोकराव माने यांच्या निवासस्थानी संपन्न झाली.

शिरोळभूषण पुरस्कारासाठी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अनेक मान्यवरांची नावे समितीकडे प्राप्त झाली असून, त्या नावांवर बैठकीत सकारात्मक आणि सविस्तर चर्चा करण्यात आली.या आठवड्यात पुरस्कारार्थींच्या नावांची अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. यंदाचा पुरस्कार सोहळा अधिक भव्य आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.या बैठकीस आमदार दलितमित्र डॉ. अशोकराव माने, उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव, माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, पंचगंगा साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन प्रताप उर्फ बाबा पाटील, गुरुदत्त शुगर्सचे संचालक शिवाजीराव माने देशमुख, शिवाजीराव जाधव, माजी सरपंच गजानन संकपाळ, गोरखनाथ माने, दरगोबा दूध संस्थेचे चेअरमन आप्पासाहेब गावडे, नगरसेवक विजय आरगे, बाजार समितीचे संचालक विजयसिंह माने देशमुख,तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष अविनाश उर्फ पांडुरंग माने,शिरोळभूषण दिलीपराव माने,बजरंग काळे, धनाजी पाटील नरदेकर, पत्रकार बाळासाहेब माळी, डॉ. दगडू माने, चंद्रकांत भाट, माजी नगरसेवक दादासो कोळी, दयानंद जाधव, उल्हास पाटील, बबन बन्ने, सागर कोळी, सुरज कांबळे, बाळासाहेब कोळी, बापूसाहेब गंगधर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.शिरोळ तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींना गौरविणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!