पुलाची शिरोली/ प्रतिनिधी कुबेर हंकारे
लव्ह जिहाद, लँड जिहाद आणि व्होट जिहादच्या माध्यमातून हिंदू धर्मावर होणारा अत्याचार आता कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही. हिंदू मुलींचे आणि महिलांचे रक्षण करण्यासाठी संपूर्ण हिंदू समाजाने एकत्र येण्याची गरज आहे. जिथे लव्ह जिहादची प्रकरणे घडतील, तिथे गुन्हेगारांना आणि त्यांना साथ देणाऱ्यांना अद्दल घडवण्यासाठी आम्ही शिरोली ग्रामस्थांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत असे प्रतिपादन आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिरोली पुलाची ता हातकणंगले येथील हिंदू जनआक्रोश सभेत केले. तसेच न्यायालयाच्या आदेशानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील मशिदींवर असणारे भोंगे जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासनाने कायद्याच्या चौकटीत राहून तात्काळ काढून टाकावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
शिरोली पुलाची येथे लव्ह जिहाद आणि धर्मांतरण घटनेच्या निषेधार्थ आयोजित करण्यात आलेल्या हिंदू जन आक्रोश सभेत मुख्य वक्ते म्हणून ते बोलत होते. या सभेला अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप आणि हिंदू धर्म जागृतीचे सागर बेग यांची प्रमुख उपस्थिती होती.आपल्या भाषणात पुढे बोलताना आमदार पडळकर म्हणाले की, हिंदू मुलींची अन्यायकारक प्रकरणे जिथे कुठे उघडकीस येतील, तिथे संबंधित मुस्लिम जिहादी तरुणांचा कायमचा बंदोबस्त केला पाहिजे. हिंदूंनी आता शांत न बसता अशा प्रवृत्तींना जशास तसे उत्तर देण्यासाठी संघटित झाले पाहिजे यावेळी पडळकर यांनी देशभरात हिंदू महिलांवर होणाऱ्या अन्यायाचा आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या मुस्लिम नेत्यांचा खरपूस समाचार घेतला. नाशिक प्रकरणातील आरोपी महिलेला आश्रय देणारे संभाजीनगरचे एमआयएम पक्षाचे नगरसेवक तसेच या दोघांनाही पाठीशी घालणारे माजी खासदार इम्तियाज जलील यांना आरोपी करून पोलिसांनी तात्काळ अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली. सर्वधर्मसमभाव फक्त हिंदूंनीच पाळायचा आणि मुस्लिमांनी त्याचे लचके तोडायचे, हे महाराष्ट्रात यापुढे खपवून घेतले जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.यावेळी बोलताना आमदार संग्राम जगताप यांनी हिंदू तरुणांना संघटित होण्याचे आवाहन केले. ते म्हणाले लव्ह जिहाद, लँड जिहादसोबतच आता ट्रॅव्हल जिहाद देखील समोर येत असून, हिंदूंनी एकत्र येऊन याचा बिमोड केला पाहिजे. अशा प्रकरणांसाठी पैसा कोठून येतो आणि या अपप्रवृत्तींना कोणाचा पाठिंबा आहे, याची शासनाने सखोल चौकशी करून कडक कारवाई करावी. मुस्लिम मौलवी समाजाचे ध्रुवीकरण करत असताना, आपण आपल्या धर्माची कट्टरता आणि जागरूकता निर्माण करत आहोत. भविष्यातील पिढीच्या रक्षणासाठी आपल्याला जागृत राहावे लागेल. भगवा बघताच लव्ह जिहादी प्रवृत्ती थरथर कापली पाहिजे, असे वातावरण निर्माण करा असे आवाहन आमदार जगताप यांनी केले.हिंदू धर्म जागृतीचे सागरभैय्या बेग यांनी आपल्या भाषणात विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, महाराष्ट्रात लव्ह जिहादच्या घटना आता उघड होत असून सरकार आपल्या पाठीशी आहे. न्यायालयाने अशा प्रवृत्तींना कडक शिक्षा सुनावली पाहिजे. त्यांनी सनदे देसाई यांच्यावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले, तसेच गावातील मदरशांना रीतसर परवानगी आहे का, याची माहिती अधिकार कायद्यांतर्गत चौकशी करण्याची मागणी केली.हिंदूंनी मंदिर कायदा आणि संविधानाच्या चौकटीत राहूनच काम केले पाहिजे. हलाल सर्टिफाइड वस्तूंवर पूर्णपणे बहिष्कार टाका कारण याच पैशांचा वापर देशात दंगली, बॉम्बस्फोट आणि हिंदू मुलींना पळवून नेण्यासाठी केला जातो. आपल्या मुलींना हिंदू धर्म समजण्यासाठी त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेमध्ये पाठवले पाहिजे असे आवाहनही बेग यांनी यावेळी केले.यावेळी जन आक्रोश सभेला माजी लोकनियुक्त सरपंच शशिकांत खवरे, राजेश पाटील, माजी जि.प सदस्य महेश चव्हाण , धनाजी पाटील, माजी उपसरपंच कृष्णात करपे, उत्तम पाटील, ह.भ.प. विठ्ठल पाटील,नंदू जाधव,अनिल खवरे, नितीन चव्हाण, संतोष बाटे , नितीन दळवी,प्रमोद पाटील, उपसरपंच विजय जाधव, संजय पाटील, प्रशांत कागले, संदीप पाटील, अर्जुन चौगुले, राजेंद्र सुतार, संदीप पोर्लेकर, सागर कौंदाडे, दीपक यादव, पंचायत समिती सदस्य अरुण माळी , प्रकाश कौंदाडे , वडगाव बाजार समिती सुरेश पाटील, योगेश खाडे , अर्जुन चौगुले , तंटामुक्त अध्यक्ष सतीश पाटील , बाळासाहेब पाटील , बाबासाहेब बुधले , उत्तम पाटील , जोतीराम पोर्लेकर ,संपत संकपाळ , यांच्यासह सकल हिंदू समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील हिंदू नागरिक, तरुण वर्ग व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.