टोप येथे छत्रपती संभाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी

Spread the love

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे

टोप येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने टोप येथील प्रौढ प्रताप पुरंदर करवीर प्रांत टोप तसेच सकल हिंदू समाज यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.सकाळी हनुमान मंदिर, टोप येथे टोपचे सरपंच तानाजी पाटील, शिवसेना नेते उत्तम पाटील, विजयसिंह पाटील तसेच अन्य मान्यवरांच्या हस्ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन केले.सायंकाळी ७ वाजता गावातील मुख्य मार्गावरून भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत नृत्यार्पण, हुला हूपर सादरीकरण तसेच वै.ह.भ.प. शिरीष महाराज मोरे गुरुजी यांच्या जीवनपटाचे दर्शन घडविण्यात आले. याशिवाय आकर्षक आतषबाजीने कार्यक्रमाची रंगत अधिक वाढवली.“छत्रपती संभाजी महाराज की जय”, “छत्रपती शिवाजी महाराज की जय” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी टोपसह पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

Leave a Comment

error: Content is protected !!