पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
शिरोली पुलाची ता हातकणंगले येथील लव्ह जिहाद प्रकरणाने सध्या जिल्हयासह संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज शिरोली गावास भेट देऊन प्रशासकीय कारवाईचा आढावा घेतला. अशा जिहादी माफियांना धडा शिकवण्यासाठी शासन आणि प्रशासन सज्ज असून, पीडित मुलीच्या चारित्र्याशी खेळणाऱ्यांना १५ वर्षे तुरुंगाबाहेर येऊ देणार नाही,असा आक्रमक पवित्रा सोमय्या यांनी यावेळी घेतला.या भेटीदरम्यान सरपंच प्रतिनिधी कृष्णात करपे यांनी ग्रामपंचायतीने आतापर्यंत केलेल्या कारवाईची माहिती दिली. त्यांनी सांगितले की आरोपी सनदे आणि देसाई कुटुंबाचे घर व शेतातील पाणी , वीज बंद करून
अतिक्रमण तातडीने काढण्यात आले . येत्या ग्रामसभेत या कुटुंबांना गावातून हद्दपार करण्याचा ऐतिहासिक ठराव करण्यात येणार आहे, जेणेकरून भविष्यात अशा घटनांना आळा बसेल असे करपे यानी सांगितले या कठोर निर्णयाबद्दल किरीट सोमय्या यांनी ग्रामपंचायतीचे कौतुक करत उपस्थितांशी संवाद साधताना म्हणाले कि एप्रिल महिन्यातच अशा चार घटना समोर आल्या आहेत. हे धर्मांतराचे एक मोठे षडयंत्र असून जिहादी माफिया हिंदू मुलींना लक्ष्य करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात भगव्या झेंड्याचा आणि हिंदू आया बहिणींच्या चारित्र्याचा अपमान करणाऱ्यांना या महाराष्ट्रात स्थान नाही यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार या नराधमांना कठोर शासन करेल. आता कोणीही माफीची नौटंकी करू नये, कारण हा गुन्हा माफीपात्र नाही.तत्पूर्वी, किरीट सोमय्या यांनी गावातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी त्यांनी पोलिसांच्या तपास यंत्रणेवर समाधान व्यक्त केले आणि हिंदू समाजाने अशा प्रकारांविरुद्ध अधिक जागृत राहण्याचे आवाहन केले.या प्रसंगी उपसरपंच विजय जाधव, बाजीराव पाटील,तंटामुक्त अध्यक्ष सतीश पाटील, भाजप तालुकाध्यक्ष अमरसिंह पाटील, राजेश पाटील, कुमार पाटील, दीपक यादव, महादेव सुतार, दीपक रानमाळे, अर्जुन चौगुले, दिलीप कौंदाडे, प्रशांत कागले, बाळू पाटील, संपत संकपाळ, प्रशांत कागले ,ग्रामविकास अधिकारी गीता कोळी, सुजाता पाटील, शिवाजी समुद्रे, योगेश खवरे, बाजीराव पाटील, संदीप तानवडे यांच्यासह ग्रामपंचायतीचे सदस्य आणि हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.