पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर अपघात ट्रकचे मोठे नुकसान

Spread the love

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर आज पहाटेच्या सुमारास नागाव येथील मेनन पिस्टन कंपनीसमोर चालकाचा झोपेच्या नादात ट्रक वरील ताबा सुटून एक आयशर ट्रक महामार्गाच्या कडेला संरक्षण भिंतीसाठी खोदण्यात आलेल्या खोल खड्ड्यात कोसळला. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ट्रकचे प्रचंड नुकसान झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार आयशर ट्रक पुण्याहून कोल्हापूरच्या दिशेने ६ वाजण्यासुमार जात असताना नागाव हद्दीत मेनन पिस्टन कंपनीसमोर आला असता, चालकाला झोपेची डुलकी लागली. यामुळे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि ट्रक थेट महामार्गाच्या कडेला असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी जाऊन पडला. येथे मोठी संरक्षण भिंत बांधण्याचे काम चालू असल्याने खोल खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडला या ट्रकचे मोठे नुकसान झाले .गेल्या सहा महिन्यांतील या परिसरातील हि दुसरी घटना आहे . महामार्गाच्या कडेला संरक्षण भिंतीचे काम सुरू असून त्यासाठी मोठमोठे खड्डे खोदण्यात आले आहेत. मात्र, या कामाचा वेग अत्यंत संथ असून ते वेळेत पूर्ण केले जात नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने पुरेशी खबरदारी न घेतल्याने हे अपघात घडत असल्याची चर्चा परिसरात आहे .

Leave a Comment

error: Content is protected !!