पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
शिरोली परिसरातून समोर आलेल्या एका खळबळजनक लव्ह जिहाद प्रकरणामुळे केवळ परिसरच नव्हे, तर संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. या प्रकरणाचे धागेदोरे आता जिल्ह्याच्या अन्य भागांतही पोहोचले असून, या प्रकरणाची व्याप्ती वाढत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. या घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण शिरोली परिसरात संतापाची लाट असून, प्रशासकीय आणि सामाजिक स्तरावर कडक पावले उचलली जात असून आज ग्रामपंचायतीने आरोपी शाहिद सनदे याच्या घराच्या अतिक्रमणावर हातोडा मारला.या लव्ह जिहाद प्रकरणाच्या निषेधार्थ मंगळवारी शिरोली बंदची हाक देण्यात आली होती. ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळून या घटनेचा निषेध व्यक्त केला. दरम्यान, संतप्त ग्रामस्थांच्या मागणीनुसार आणि कारवाईचा भाग म्हणून आरोपीच्या घराचे नळपाणी कनेक्शनही कट केले होते पण आज सकाळी शिरोली ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत आरोपी शाहिद सनदे याच्या घरावर कारवाई केली. घराचा काही भाग हा सार्वजनिक जागेत आणि अतिक्रमणात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर प्रशासनाकडून तो भाग पाडण्यात आला. तसेच रस्त्यावर अडथळा ठरणारा ट्रॅक्टरही तिथून हटवण्यात आला.यावेळी माजी उपसरपंच कृष्णात करपे , माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश कौंदाडे , दिपक यादव , अविनाश कोळी , मोहितेन देसाई , योगेश खवरे , अर्जुन चौगुले , निलेश शिंदे, विशाल खोचेकर , व ग्रामपंचायत कर्मचारी