पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
पुलाची शिरोली येथील सर्वेश्वर महादेव मंदिरात महात्मा बसवेश्वर जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.सकाळपासूनच मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.कार्यक्रमाची सुरुवात महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिषेकाने करून करण्यात आली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी “बसवेश्वर महाराज की जय” अशा घोषणांनी मंदिर परिसर दुमदुमून गेला. त्यानंतर लिंगायत समाजातील महिलांनी पाळणा गीत गायले.या जयंतीनिमित्त लिंगायत समाजातील महिला आणि युवकांनी विशेष पुढाकार घेतला होता. महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त महात्मा बसवेश्वर यांच्या विचारांचा जागर करण्यात आला. त्यांच्या समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या शिकवणीचे महत्त्व यावेळी अधोरेखित करण्यात आले.महात्मा बसवेश्वरानी समाजातील अंधश्रद्धा, भेदभाव आणि अन्याय याविरोधात त्यांनी दिलेल्या लढ्या महात्मा बसवेश्वरांचे विचार आजच्या पिढीला समजने अधिक गरजेचे आहे. समाजात समानता आणि मानवतेचे मूल्य जपण्यासाठी बसवेश्वरांचे तत्त्वज्ञान मार्गदर्शक आहे. शिक्षण, श्रमसंस्कार आणि प्रामाणिकपणावर त्यांनी दिलेला भर प्रत्येकाने आचरणात आणण्याची गरज आहे.कार्यक्रमानंतर सर्व भाविकांसाठी प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने प्रसादाचा लाभ घेतला. संपूर्ण कार्यक्रमात शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरण पाहायला मिळाले. मंदिर परिसर स्वच्छ आणि सजविण्यात आला होता, ज्यामुळे भक्तिमय वातावरण अधिकच खुलून आले.या कार्यक्रमासाठी लिंगायत समाजातील सर्वांनी एकत्र येऊन सहकार्य केले. मंदिर समिती सहभागामुळे कार्यक्रम यशस्वी झाला.महात्मा बसवेश्वर जयंतीच्या निमित्ताने पुलाची शिरोली येथे एकात्मता आणि सामाजिक ऐक्याचे दर्शन घडले. अशा प्रकारचे कार्यक्रम समाजाला सकारात्मक दिशा देणारे असून भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.या कार्यक्रमाचे नियोजन पुलाची शिरोली येथील समस्त लिंगायत समाजातर्फे करण्यात आले होते.यावेळी उपस्थित मान्यवर उपसरपंच विजय जाधव ,मधुकर पदमाई, बाळू सोडगे, निशिकांत पदमाई, उत्तम पाटील, उद्योजक उदय खटाळे, शिवाजी लंबे , अरुण सोडगे तसेच समाजातील मान्यवर महिला युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते