जयसिंगपूर / प्रतिनिधी
आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना सर्वसामान्य जनतेचा मोठा पाठिंबा मिळत आहे.शिरोळ तालुक्यात आमदार यड्रावकर यांच्या वाढत्या जनाधारामुळे स्वबळाची भाषा करणारे अनेक राजकीय पक्ष आता युतीची भाषा करू लागले आहे.दोन विधानसभा निवडणुका अपक्ष म्हणून लढवली असून त्यांना जनतेचा मोठा पाठिंबा मिळाला आहे.त्यामुळं आमदार यड्रावकर यांनी आपल्या राजर्षी शाहू विकास आघाडीच्या नेतृत्वाखाली जयसिंगपूर,शिरोळ आणि कुरुंदवाड नगरपालिकांच्या निवडणुका लढवाव्यात.गेल्या पाच वर्षांत आमदार यड्रावकर यांनी तिन्ही नगरपालिकांच्या सर्वांगीण विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.रस्ते,पाणीपुरवठा, आरोग्य,शिक्षण,सांस्कृतिक विकास अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामे झाल्यामुळे या भागाचा चेहरामोहरा बदलला आहे.नागरिकांच्या गरजा आणि समस्या जाणून घेत विकासाचे नियोजन करणाऱ्या यड्रावकर यांच्या कार्यशैलीला सर्वच स्तरातून प्रतिसाद मिळत आहे. यड्रावकर यांच्या नेतृत्वाखाली राजर्षी शाहू विकास आघाडीने ‘विकास हा धर्म,जनतेचा विश्वास हा बळ’ या भूमिकेवर ठाम राहून काम केले आहे.त्यामुळेच जनतेत आघाडीबद्दल विश्वास निर्माण झाला आहे.आज नगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून,युतीच्या चर्चांना वेग आला आहे.यड्रावकर यांनी कोणत्याही युतीत न जाता स्वतंत्रपणे आघाडीचे उमेदवार म्हणून निवडणुका लढवाव्यात.गेल्या पाच वर्षांत जयसिंगपूर,शिरोळ आणि कुरुंदवाड या शहरांना निधीच्या माध्यमातून अनेक कामे पूर्ण तर काही प्रलंबित योजना पूर्णत्वास येत त्यामुळं विकास निधी मंजूर करण्यात आमदार यड्रावकर सक्षम नेतृत्व असल्याची भावना जनतेत आहे. दरम्यान आगामी काळात या नगरपालिका निवडणुकीसाठी आघाडीचे धोरण काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. परंतु जनतेच्या वाढत्या विश्वासामुळे राजर्षी शाहू विकास आघाडी आगामी निवडणुकांमध्ये प्रभावी कामगिरी करेल,असा विश्वास व्यक्त केला जात आहे.