शिरोळ नगरपालिकेच्या निवडणुकीत ‘राजर्षी शाहू विकास आघाडी’ मैदानात उतरणार, भाजप स्वबळावर लढणार ?

Spread the love

प्रतिनिधी – शिरोळ

शिरोळ शहराच्या विकासाचा नवा अध्याय आता नगरपालिकेच्या रूपाने सुरू होत असून, या पार्श्वभूमीवर येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राजकीय हालचाली वेग घेऊ लागल्या आहेत.अलीकडेच शिरोळ येथे आयोजित कार्यक्रमात आमदार राजेंद्र पाटील (यड्रावकर) यांनी शिरोळातील जनतेला ‘राजर्षी शाहू विकास आघाडी’वर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले. ग्रामपंचायतीपासून नगरपालिकेपर्यंतच्या प्रवासात नागरिकांनी विकास आघाडीवर दाखवलेला विश्वास पुढेही कायम ठेवावा, असे त्यांनी सांगितले.यावेळी आमदार पाटील म्हणाले की, “शिरोळ शहराचा सर्वांगीण विकास करणे हे आमचे ध्येय आहे. देशात आणि राज्यात आपल्या विचारांचे सरकार सत्तेवर आहे. त्यामुळे त्याच विचाराचे लोक नगरपालिकेत निवडून आले, तर शहराचा विकास अधिक गतीने होईल. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, भुयारी गटर योजना, रस्ते, प्रकाशयोजना तसेच नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी ठोस पावले उचलली जातील.शहरातील सर्व भौतिक सुविधा उपलब्ध करून देत नागरिकांना दर्जेदार सेवा देण्याचा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला. तसेच, शिरोळचा विकास हा फक्त आश्वासनापुरता न राहता प्रत्यक्ष कामातून दिसून येईल, असेही त्यांनी सांगितले.दरम्यान, आमदारांच्या या वक्तव्यामुळे आगामी नगरपालिका निवडणुकीत ‘राजर्षी शाहू विकास आघाडी’ मैदानात उतरणार हे निश्चित झाले आहे.त्यामुळे आता भाजप स्वबळावर लढणार की विकास आघाडीला पाठिंबा देणार,याकडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.शिरोळ नगरपालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत कोणाचा पारडं जड ठरणार,याची राजकीय वर्तुळात चुणचुणीत चर्चा सुरू झाली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!