शिरोळ/ प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यातील बस्तवाड परिसरात अज्ञात इसमांनी दोन ट्रॅक्टरच्या टायरींना आग लावल्याची धक्कादायक घटना घडली आहे.या घटनेत सुमारे ६० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद कुरुंदवाड पोलिस ठाण्यात झाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री ९.३० ते ११.३० वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. नजीर अहमद करमुद्दीन पटेल यांच्या मालकीच्या शेतापासून सुमारे २०० मीटर अंतरावर, बस्तवाड ते कुरुंदवाड या मार्गावर टॅक्टर व त्याला जोडलेले दोन डबे तसेच बाळासाहेब मच्छिंद्र दराडे यांच्या टॅक्टरच्या टायरींना अज्ञात व्यक्तींनी सुलोचन टाकून आग लावली.या घटनेत प्रत्येकी सुमारे ३०,००० रुपये किंमतीच्या टायरी जळाल्यामुळे एकूण ६०,००० रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत फिर्यादी प्यारेसाब साहेबहजरत पाटील (वय ३९, रा. बरत्तवाड, ता. शिरोळ) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.या प्रकरणी कुरुंदवाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.