साने गुरुजी विद्यालयाच्या सिद्धी दत्तवाडे व ईश्वरी चौगुले यांची राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

सांगली येथे नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत कराटे प्रकारात कुरुंदवाड येथील साने गुरुजी विद्यालयाच्या दोन विद्यार्थिनींनी उल्लेखनीय कामगिरी करून आपले व विद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे.या स्पर्धेत १४ वर्षाखालील गटात सिद्धी दत्तवाडे (इ.६वी) हिने तर १७ वर्षाखालील गटात ईश्वरी चौगुले (इ.८वी) हिने सुवर्णपदक पटकावत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला. त्यांच्या या भव्य यशामुळे दोघींचीही राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे.या स्पर्धेदरम्यान दोन्ही विद्यार्थिनींनी दाखवलेले आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण आणि कराटेतील कसब पाहून परीक्षकांनी त्यांचे विशेष कौतुक केले.स्पर्धेच्या तयारीसाठी क्रीडा शिक्षक शरद तावदारे व चंद्रकांत लाड यांनी सातत्यपूर्ण मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रशिक्षणामुळेच विद्यार्थिनींनी हे यश संपादन केल्याचे विद्यालयाकडून सांगण्यात आले.साने गुरुजी विद्यालयाचे मुख्याध्यापक किरण पाटील यांनी या विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करताना सांगितले की,सिद्धी आणि ईश्वरी या दोघींनी मेहनत,शिस्त आणि चिकाटीच्या जोरावर हे यश मिळवले आहे. राज्यस्तरीय स्पर्धेत त्या निश्चितच अधिक चांगली कामगिरी करतील, असा आम्हाला विश्वास आहे.संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील व सचिव अजित पाटील यांनीही विद्यार्थिनींचा सत्कार करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.या विजयामुळे संपूर्ण विद्यालयात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थिनींच्या यशाने केवळ विद्यालयाचाच नव्हे तर कुरुंदवाड शहराचाही अभिमान वाढवला आहे. पालकवर्ग, शिक्षक व विद्यार्थी यांच्यात उत्साहाचे वातावरण असून राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत दोघीही सुवर्ण कामगिरी करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!