“ब्रेकींग न्यूज” ऊसाचे आंदोलन चिघळलं शिरोळमध्ये ऊस वाहतूक रोखताना धनाजी चुडमुंगे यांना मारहाण

Spread the love

प्रतिनिधी / शिरोळ

शिरोळ तालुक्यात ऊस दराच्या प्रश्नावरून सुरू असलेल्या आंदोलनाला गुरुवारी रात्री तीव्र वळण लागले.रास्त आणि परवडणारा ऊस दर मिळावा, यासाठी सतत लढा देणारे आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांना शिरोळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मारहाण करण्यात आली.या घटनेनंतर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले असून,आंदोलन चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.दत्त साखर कारखान्याने जाहीर केलेला ३४०० रुपये प्रति टन दर शेतकऱ्यांना परवडणारा नसल्याचा आरोप धनाजी चुडमुंगे यांनी केला होता.त्यांनी सांगितले की, कारखाना फक्त एफ.आर.पी.एवढाच दर देत असून,साखर आणि उपपदार्थांना चांगले भाव मिळूनही शेतकऱ्यांना नफ्यातील एक रुपयाही मिळत नाही.या पार्श्वभूमीवर चुडमुंगे यांनी शिरोळ व परिसरातील शेतकऱ्यांना ऊस तोड न घेण्याचे आवाहन केले होते.दरम्यान,काही शेतकऱ्यांनी ऊस तोडी सुरू केल्याचे लक्षात येताच चुडमुंगे यांनी त्या तोड थांबविण्याचा प्रयत्न केला.संध्याकाळी सातच्या सुमारास त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात दत्त कारखान्याकडे जाणारी ऊसवाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला असता,कारखान्याच्या समर्थकांनी त्यांच्यावर हल्ला केला.ट्रॅक्टरसमोर उभे राहिलेल्या चुडमुंगे यांना बाजूला फरफटत नेण्यात आले,अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.या घटनेनंतर शिरोळ परिसरातील शेकडो शेतकरी चौकात जमले आणि कारखानाविरोधात घोषणाबाजी केली.पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.या मारहाणीच्या घटनेमुळे ऊस दराचा प्रश्न आणखी तापण्याची शक्यता वर्तवली जात असून,पुढील काही दिवसांत आंदोलन अधिक तीव्र होण्याचे संकेत मिळत आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!